आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिस शाखेकडून घरपोच पावती पाठवण्यात येत आहे. परंतु यात मूळ दुचाकी चालकाला विना हेल्मेट पावती गेली. मात्र पावती सोबत गेलेल्या छायाचित्रात त्यांच्या दुचाकी ऐवजी त्याच क्रमांकाची दुसरीच दुचाकी व चालक छायाचित्रात दिसून आला आहे. मदन बाबूराव राठोड (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांच्यासोबत हा प्रकार घडला.
रस्त्यावर नियम मोडल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करत असताना दुचाकी चालक पोलिसांशी वाद घालतात. त्यामुळे अशा दुचाकीचालकाचे छायाचित्र मोबाइल मध्ये काढून सेफ सिटीच्या माध्यमातून त्यांच्या दुचाकी क्रमांकानुसार घरी दंडाची नोटीस पाठवली जाते. मदन यांच्याकडे मोटारसायकल (एम एच २० - सी एल - ८७४९) आहे. ४ डिसेंबर रोजी ओअॅसिस चौकातून दुपारी सव्वापाच वाजता विनाहेल्मेट दुचाकी चालवल्याप्रकरणी त्यांना १५ डिसेंबर २०१८ रोजी घरी ५०० रुपयांची दंडाची नोटीस गेेली. यासोबत छायाचित्र देखील जोडले होते. परंतु छायाचित्रात त्यांच्या दुचाकीच्या त्याच क्रमांकाची मात्र दुसरी दुचाकी आढळली. त्यावर अनोळखी व्यक्ती आहे. त्यावरून छायाचित्रातील दुचाकी चोरीची असून त्यावर चोराने हा क्रमांक टाकून फिरवत असल्याचे समोर आले.
चोरीची प्रकरणे समाेर, पण गांभीर्याने घेईना
सेफ सिटीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या नोटिसा जाण्याच्या मोहिमेतून असे अनेक प्रकार समोर आले. यात छायाचित्र देखील असते. त्यामुळे त्यातील बनावट क्रमांक टाकून दुचाकी चालवणाऱ्या चोरांना पकडणे पोलिसांना शक्य आहे. परंतु असे आतापर्यंत १५ पेक्षा अधिक प्रकरणे समोर आल्यानंतरही यातील बनावट क्रमांक टाकून फिरणारे चोरांवर कुठलीही कारवाई झालेली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.