आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Trailer Driver Escaped After Misbehaved With Policeman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसाची कॉलर पकडून ढकलून देत वाळूमाफिया ट्रॅक्टरचालक फरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहागड -  वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंबड तालुक्यातील गोंदीपासून जवळच असलेल्या हसनापूरच्या गोदावरी पात्रात कारवाई करण्यासाठी गेलेले पोलिस शिपाई मदन गायकवाड यांची कॉलर पकडून त्यांना ढकलून देत वाळू माफिया ट्रॅक्टरसह फरार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. गोलू ऊर्फ आर्यनरेश सूर्यप्रकाश तिवारी (२६, गोंदी, ता. अंबड) असे आरोपीचे नाव आहे.  


हसनापूरच्या गोदावरी पात्रात दहा ते बारा ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू वाळू तस्कर गोदावरी नदी  पात्राच्या काठावर साठे करत असल्याची गोपनीय माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांचे पथक हसनापूर गोदापात्रात पोहोचले. या वेळी पोलिसांना पाहताच काही काही ट्रॅक्टर चालकांनी या ठिकाणाहून धूम ठोकली. परंतु,  एक विनानंबरचे एक ब्रास वाळू भरलेले  ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले.   ट्रॅक्टर चालक राजू सुदामराव गात (३०, गोंदी ता.अंबड) याच्या ताब्यातील हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.   दुसऱ्या कारवाईत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलिस शिपाई मदन गायकवाड यांनी एक ब्रास अवैध वाळूसह ट्रॅक्टर ट्रॉली याच पात्रात पकडली.  पोलिस शिपाई गायकवाड हे ट्रॅक्टर गोंदी पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याचे लक्षात येताच  चालक गोलू ऊर्फ आर्यनरेश सूर्यप्रकाश तिवारी (२६ गोंदी) याने गायकवाड यांची कॉलर धरून त्यांना ढकलून देत शिवीगाळ केली.  तसेच वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन फरार झाला. या प्रकरणी   गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोलू तिवारीवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी  व धक्काबुक्कीसह दोन्ही ट्रॅक्टरवर गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.