• Home
  • Bollywood
  • Gossip
  • The trailer release of 'The Sky is Pink', chemistry of Priyanka Chopra and Farhan Akhtar looks great in the trailer

Bollywood / 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जबरदस्त दिसत आहे प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरची केमिस्ट्री 

ट्रेलरमध्ये दिसला जयरा वासिमचा उत्तम अभिनय  

Sep 10,2019 01:54:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांचा चित्रपट 'द स्काय इज पिंक' चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. आधी हा चित्रपट मोटिव्हेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या आयष्यावर आधारित असल्याचे सांगितले जात होते, पण ही आयेशाची नाही तर तिच्या आई वडिलांची लव्ह स्टोरी आहे. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरने आयेशा चौधरीचे आई वडील आदिती आणि नीरेन यांची भूमिका साकारली आहे. आयेशाच्या भूमिकेत जायरा वसीम आहे. चित्रपटात आयेशा प्रेमाने आपल्या आईवडिलांना ‘पांडा’ आणि ‘मूस’ म्हणते. आयेशाला लंग्स डॅमेजसारखा गंभीर आजार असतो आणि याचदरम्यानचे कुटुंबातील सर्व चढउतार या चित्रपटात दाखवले गेले आहेत. हा चित्रपट यावरच आधारित आहे.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर...

X