आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशिक्षणार्थी पोलिसांनी दूध पाकिटांत तयार केली ३५ हजार रोपे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लहू गाढे 

जालना - पोलिस दलात भरती झाल्यानंतर हजारो पोलिसांना आरपीटीएसमध्ये प्रशिक्षण दिले जाते. यातील २०१९ च्या मे महिन्याच्या बॅचमधील प्रशिक्षणार्थींच्या मदतीने ९५ हजार वृक्ष लावून केंद्राचा परिसर हिरवागार करण्यात आला आहे. ९२६ प्रशिक्षणार्थींसाठी दररोज १५० च्या जवळपास दुधाची पाकिटे   येत होती. या पाकिटांचा वापर होण्यासाठी परिसरात हिरवी नेट करून रिकाम्या पाकिटांमध्ये काळी माती, खत टाकून बियाण्यांची लागवड करून  ३५ हजार रोपे तयार करून लागवड करण्यात आली आहे. 

जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. दरम्यान, गतवर्षी उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळणे कठीण झाले होते. यामुळे त्यांनी त्यांच्याच परिसरात पाणी अडवण्यासाठी तसेच वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला. प्रशिक्षणार्थींच्या मदतीने तब्बल ९५ हजार वृक्षांची लागवड केली आहे. तर या परिसरातील नाल्या खोदून मोठ्या प्रमाणात पाणी अडवले आहे. दरम्यान, टाकाऊपासून टिकाऊ या तंत्राचाही उपयोग करण्यात आला आहे. प्रशिक्षण केंद्रातील आहारासाठी दररोज १५० दुधाची पाकिट येतात.  या पाकिटांचा वापरही प्रशिक्षणार्थींनी चांगल्या प्रकारे केला आहे. पाकिटांमध्ये माती, खत टाकून बियाण्यांची लागवड करून हिरव्या नेटमध्ये त्याची काळजी घेतली. दररोज पाणी देणे, त्यांची देखभाल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची निर्मिती झाली. हेच वृक्ष परिसरात लावल्यामुळे हा परिसर हिरवागार होण्यासाठी मदत झाली आहे. प्रशिक्षण केंद्राने राबवलेल्या या उपक्रमाचे औरंगाबादचे न्यायाधीश वेदपाठक, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, सीईओ निमा अरोरा, पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पाहणी करून  कौतुक केले आहे. २०८ एकर परिसरात खोलगट समतल चर, मातीनाला बंधारे, नाला खोलीकरणामुळे पाणी अडवण्यास मदत झाली आहे. वृक्ष लागवडीमुळेही मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. दोन महिन्यांत रोपे तयार


प्रशिक्षणार्थींनी दूध प्यायल्यानंतर त्या प्लास्टिक पिशव्या फेकून न देता एका ठिकाणी जमा केल्या. हिरवी नेट करून त्या ठिकाणी काळी माती, सेंद्रिय खत भरून बॅगा तयार केल्या. यात निम, करंज यांची रोपे टाकून दररोज पाणी टाकून त्याची निगा राखली. काळजीपूर्वक निगा राखल्यामुळे तब्बल ३५ हजार रोपटे जगवून त्यांची लागवडही करण्यात आली आहे. आगामी काळातील वृक्ष लागवडीसाठी ही मंडळी प्रयत्नशील आहे. परिश्रमाचे फलित 


जवानांच्या परिश्रमातून हे सर्व उभे राहिले आहे. जलसंधारण कामांमुळे पावसाचे पाणी याच परिसरात मुरणार आहे. तसेच वृक्ष लागवडीमुळे हा परिसर हिरवागार होण्यास मदत झाली आहे. निसर्गरम्य वातावरण झाले आहे. बियांचे रोपे लावण्यासाठी दुधांच्या पिशव्यांचा वापर करण्यात आला आहे.
नामदेव चव्हाण, प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना.

बातम्या आणखी आहेत...