आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Trapped Child Continued Pointing To The Mother, But Did Not Descend; Both Dead

अडकलेला मुलगा आईकडे इशारा करत राहिला, पण उतरला नाही; दाेघांचाही मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळती बस प्रत्यक्षदर्शी आणि प्रवाशाने कथन केली घटनेची कहाणी
  • डीएनए चाचणी पटवणार मृतांची ओळख

​​​​​​​कन्नाेज : उत्तर प्रदेशातल्या कन्नाेजमध्ये शुक्रवारी एका ट्रकला धडक दिल्यानंतर स्लीपर बसला आग लागली. बसमध्ये ४३ प्रवासी हाेतेे. त्यातील २० पेक्षा जास्त प्रवासी जिवंत जळण्याची शक्यता आहे. कन्नाेजचे डीएम रवींद्रकुमार यांनी ११ लाेकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. पाेलिस महासंचालक माेहित अग्रवाल म्हणाले, वाचवलेल्या २५ पैकी २३ रुग्णालयात भरती आहेत. आठ ते दहा मृतदेहांचे अवशेष मिळालेले आहेत.प्रत्यक्षदर्शी म्हणाला एक मूल खिडकीत आले. बाहेरच्या लाेकांनी तउडी मारायला सांगितले. पण ताे बसमध्ये अडकलेल्या आईकडे वारंवार इशारा करत हाेता. थाेड्याच वेळात त्या निष्पाप मुलालाही आगीच्या ज्वाळांनी वेढले.

जर थोडा उशीर झाला असता तर कदाचित मीसुद्धा…

बसमधील रामप्रकाशने खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. ते म्हणाले - अपघातादरम्यान बसची गती ताशी ५०-६० किमी होती. अचानक जाेराचा धक्का बसला आणि बसला आग लागल्यानंतर लोकांनी आरडाओरडा सुरू केला. मी खालच्या सीटवर बसलो होतो. आगीच्या ज्वाळा बघताच मी खाली उडी मारली. जर थोडा उशीर झाला असता तर कदाचित मी पण…. लोकांचे ओरडणे ऐकून माझी छाती धडधडायला लागली. काही प्रवासी दरवाजे आणि खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच वेळी स्फोट झाला आणि वेगाने आग पसरू लागली. काही वेळातच आणखी दाेन स्फाेट झाले. आगीने पूर्ण बसला वेढले. त्यानंतर काेणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

इतका घाबरला, काचदेखील उघडू शकला नाही…

या अपघातातला दुसरा प्रवासी रणसिंग म्हणाला, जोरदार स्फोट होऊन बसला आग लागली. मी इतका घाबरलो होतो की, मला काच उघडता आली नाही. त्यानंतर आजूबाजूचे लोकदेखील तिथे पोहोचले आणि खिडकी फोडून मला बाहेर काढले.' पाेलिस अधिकारी मोहित अग्रवाल म्हणाले की, अपघाताच्या १२ तासांनंतर असे बरेच लाेक आढळून आले आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य ना रुग्णालयात आहेत ना घटनास्थळी आहेत. त्यांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.त्यांची ओळख डीएनए चाचणीद्वारे होईल.