आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीच्या रामनगरात ३० दिवसांसाठी साकारते त्रेतायुग; अयोध्या, जनकपूर, लंका, अशाेक वाटिका, किष्किंधा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताराचंद गवारिया 

वाराणसी  - सायंकाळचे पाच वाजलेले. वाराणसीच्या रामनगरमध्ये हत्तींची स्वारी लंकेच्या दिशेने जात आहे. सर्वात पुढे हत्तीवर काशी नरेश डॉ. अनंत नारायण सिंह स्वार आहेत. हत्तींची पावले लंकेच्या मैदानावर पडताच रामलीला पाहण्यासाठी आलेल्या हजारो गावकऱ्यांच्या तोंडून आपसूक जयघोष होऊ लागतो- ‘बोल दे रामचंद्र की जय, श्री लखन लाल की जय, श्री हनुमान की जय, बोलो रे हर हर महादेव..’

तिन्ही हत्तींसह सर्व उपस्थित श्रोतृवर्ग रावण महालाच्या बाहेर स्थानापन्न होतो आणि रामलीला सुरू होते. १२ रामायणी (रामायणाची गायक मंडळी) रिंगण करून उभे असतात. प्रत्येक गायकाच्या हाती मृदंग आहे. मग पंचम व सप्तम स्वरात रामायणातील प्रसंगांच्या स्वराविष्काराला सुरुवात होते. सूर घुमू लागताच रामायणातील पात्रांना साकारणारे कलाकार अभिनयाला सुरुवात करतात. रामलीलामध्ये दोन व्यासही आहेत. अर्थात, दोन कलाकार. पैकी एक भगवंताच्या पात्राचा संवाद बोलतो व दुसरा उर्वरित पात्रांचे संवाद म्हणतो. रामायणी अचानक गाणे बंद करतात. त्याच क्षणी व्यास जोराने सर्वांना शांत बसण्याची सूचना करतात. आता भगवान रामाचा संवाद आहे, असे ते सांगतात. रामलीलामध्ये दोन प्रसंग (लीला) होतील. पहिली लक्ष्मण शक्ती व दुसरा चार फाटकांची (रावण महालाच्या दारातील लढाई) लढाई. 

..अंधार वाढू लागतो. मशाली, टेंभ्यांचा प्रकाश सर्वत्र पसरू लागतो. महालाच्या बाहेर रावण युद्धाची रणनीतीचा संवाद सुरू झाला आहे. महालाच्या बाहेर चार मोठे पुतळे आहेत. जणू शिपाई किल्ल्यावर पहारा देत आहेत. तेवढ्यात मोठा स्फोट होतो. फटाके फुटू लागतात. म्हणजेच युद्ध सुरू झाले. लक्ष्मण बेशुद्ध होतो. हनुमान संजीवनीने लक्ष्मणला शुद्धीवर आणतात. त्यानंतर ६० फूट उंच कुंभकर्णाचा अंत करण्यासाठी राम चार वेळा बाण चालवतात. त्यात पहिल्यांदा उजवा हात, शीर आणि सर्वात शेवटी पोट शरीरापासून वेगळे होते. त्यानंतर लक्ष्मण व मेघदूतांचे युद्ध होते. मेघदूताच्या बदललेल्या रूपाचे दृश्य दाखवण्यासाठी चार मोठे पुतळे तयार केले आहेत. या पुतळ्यांसमोर युद्धाचा प्रसंग दाखवला जातो. लक्ष्मण मेघदूताचा वध करतो, येथे रामलीला समाप्त होते. गावकरी एकस्वरात जयघोष करतात- ‘जय श्री रघुनंदन जय श्रीराम.’शेवटी गुरुवारी रामनगरच्या अयोध्येत भगवान राम सिंहासनावर विराजमान होतील. १२ ऑक्टोबर रोजी काकड आरतीने रामलीलाचा खरा समारोप होईल. ३० िदवसांची ही रामलीला पाहण्यासाठी सुमारे ३ लाख लोक आवर्जून हजेरी लावतील. बीएचयूचे प्रोफेसर विजयनाथ मिश्रा म्हणाले, १९८५ पर्यंत रामलीलामध्ये २१ तोफांची सलामी दिली जायची. 
 

काशी नरेश सर्व ३० दिवस रामलीलेदरम्यान हजेरी लावतात
काशी नरेश रामलीलेच्या ३० दिवसांच्या काळात दररोज हजर असतात. या निमित्ताने ५ किमीपर्यंतचा भाग रामलीलामय होतो. एवढ्या व्यापक प्रमाणात साजरी होणारी ही देशातील एकमेव रामलीला आहे. येथे जणू अशोक वाटिका, अयोध्या, जनकपूर, किष्किंधा साकारली जाते.  
 

जनता घरून चटई, रामचरित मानस घेऊन सहभागी होतात..
५५ वर्षांपासून अखंडपणे रामलीलेत सहभागी होणारे लखनलाल जौहरी म्हणाले, लोक घरातून निघताना चटई, रामचरित मानस घेऊन बाहेर पडतात. बॅटरीच्या उजेडात रामचरित मानसचे वाचन होते. काशी नरेश रामलीलेतील पात्रांची निवड करतात. 
 
 

बातम्या आणखी आहेत...