आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Troller Abuses Swara Bhaskar, She Filed A Complaint Against That Person, Mumbai Police Also Took Action

ट्रोलरने दिल्या शिव्या तर स्वरा भास्करने केली तक्रार, मुंबई पोलिसांनीही त्वरित केली कारवाई 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्वरा भास्कर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार होत असते. ट्रोलर्स अनेकदा तिला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे ट्रोल करत असतात आणि स्वरादेखील त्यांना सडेतोड उत्तर देते. अशातच एकदा असेच झाले. पण यावेळी ट्रोलरने आपल्या मर्यादा ओलांडल्या तर स्वराने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पोलिसांनीही याप्रकरणी त्वरित कारवाई केली. 

 

ट्रोलरने स्वराला दिल्या शिव्या... 
ट्रोलरने आपल्या ट्वीटमध्ये अभद्र भाषेचा प्रयोग करून स्वरासाठी खूप अपमानास्पद गोष्टी लिहिल्या आणि तिला शिव्यादेखील दिल्या. स्वराने या ट्रोलरच्या ट्वीटवर कमेंट करून लिहिले, 'हि व्यक्ती स्वतः आपल्या बायोमध्ये स्वतःला पागल, घमंडी, नॅशनलिस्ट आणि हिंदू म्हणत आहे आणि आपल्या (आणि माझा ) धर्म आणि देशाचा अपमान करत आहे. मला वाटते हे हरॅसमेंट आणि ईव टीजिंगच्या श्रेणीमध्ये जात आहे.' स्वराने या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग केले आणि ट्रोलरविरुद्ध तक्रार दाखल केली. 

 

 

पोलिसांनी केली कारवाई... 
मुंबई पोलिसांच्या सोशल हॅन्डलचा स्वराला त्वरित रिप्लाय मिळाला आणि ते म्हणाले, 'आम्ही तुम्हाला फॉलो करायला सुरुवात केली आहे. आपण कृपया इनबॉक्समध्ये आपला कांटेक्ट नंबर द्यावा. आम्ही हे प्रकरण तत्परतेने हाताळू.