आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुण्यात लागलेल्या ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या होर्डिंग्सचे कोडे उलगडले... प्रिया बापट-उमेश कामत यांच्याही 'गुड न्यूज'चे कारण कळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर आणि  पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट या गजबजलेल्या ठिकाणी ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ या आशयाचे होर्डिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या होर्डिंगमागचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण आता ही उत्सुकता संपली आहे. कारण हे होर्डिंग कलाविश्वाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या होर्डिंगशी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा जवळचा संबंध असल्याचे समोर आले आहे. हे होर्डिंग प्रिया बापटची निर्मिती असलेल्या ‘दादा, एक गुड न्युज आहे’,  या नाटकाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या माध्यमातून प्रिया पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. प्रियाने नुकतेच सोशल मीडियावर या नाटकाचे पोस्टर रिलीज केले आहे.

 

या नाटकामध्ये अभिनेता उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही जोडी बहीण-भावाच्या रुपात दिसून येणार आहे.  खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि तितकंच बहिणीवर प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका उमेश करत आहे. तर ऋता आयुष्य एन्जॉय करणाऱ्या अल्लड मुलीची भूमिका वठवणार आहे. विशेष म्हणजे ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तर ही आहे गुड न्यूज! सोनल प्रोडक्शन्ससह आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत. This is the ‘GOOD NEWS’. This is our baby. There is no greater happiness than producing and supporting the content that you believe in. Umesh and I have been blessed with tremendous love and support from our family, friends and fans over the years. We wish to seek your blessings for this new journey. Wish us all the luck and shower your love upon this one too! #DadaEkGoodNewsAhe

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on Dec 2, 2018 at 7:39pm PST

 

प्रियाने चार दिवसांपूर्वी शेअर केली होती एक पोस्ट... 
चार दिवसांपूर्वी प्रियाने उमेश कामतसोबत एक फोटो शेअर करत गुड न्यूज असल्याचे सांगितले होते. तिच्या या पोस्टवरुन प्रिया आणि उमेश यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार, असे सगळ्यांना वाटले होते. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला. पण आज प्रियाने नाटकाचे पोस्टर शेअर करुन ही गुड न्यूज म्हणजे तिचे नवीन नाटक असल्याचे स्पष्ट केले आहे.  

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एक गुड न्यूज आहे. #feelingblessed

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on Nov 28, 2018 at 7:39pm PST

 

बातम्या आणखी आहेत...