आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेते मोहिनीराज म्हणाले, ही भूमिका थोडी हटके आहे म्हणून मी ती स्वीकारली.... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'प्रेम पॉयजन पंगा' ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे. हटके संकल्पना असेलल्या या मालिकेतील अभिनेते 'मोहिनीराज गटणे' यांची मुलाखत...

मालिका स्वीकारण्याचे नेमके कारण काय?
कलेची कदर करून स्वतःहून कुणी उत्तम भूमिका करण्याची संधी देत असेल, तर खूपच आनंद होतो. मोठ्या बॅनरने माझ्याशी संपर्क साधला याचा आनंद होता. उत्कृष्ट प्रोडक्शन आणि लोकप्रिय वाहिनीवरील मालिका, यामुळे काम नाकारण्याचा प्रश्नच येत नव्हता. याशिवाय, ही भूमिका थोडी हटके आहे. अशाप्रकारची भूमिका करत असताना, मी त्या पात्राला योग्य न्याय देऊ शकतो, याची मला खात्री होती. माझ्यातील अभिनयाचे गुण, या भूमिकेतून उत्तमरीत्या दर्शवता येतील हे लक्षात आले. म्हणून ही भूमिका स्वीकारली.

'प्रेम पॉयजन पंगा'तील भूमिकेविषयी सांगा...
दोन मुलांचा पिता आणि घरातील कर्ता पुरुष या दोन महत्त्वाच्या गोष्टी या भूमिकेशी निगडित आहेत. घरातील वातावरण नेहमी खेळीमेळीचं आणि आनंदी असावं अशी या कुटुंबप्रमुखाची इच्छा आहे. त्यामुळे घरातील सगळ्यांशी तो छान जुळवून घेतो.

या मालिकेची संकल्पनेविषयी काय सांगाल?
संकल्पना नक्कीच खूप निराळी आहे. लेखकांना ते सुचते, पण ते कसे सुचते हे सहज सांगता येत नाही. असेच या मालिकेतून पाहायला मिळते.

चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो ?
मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांचे ज्यावेळी कलाकृती उत्तम घडत असल्याचे समाधान होते, त्यावेळी प्रेक्षकांनासुद्धा ती कलाकृती आवडेल याची खात्री असते.