आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Uber Cab Driver Feeling Asleep While Driving, A Woman Passenger Drove The Car Herself For 150km

उबर कॅब चालकाला कार चालवताना येत होती झोप, महिला प्रवाशाने स्वतः 150 किलोमीटर चालवली कार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेजस्विनी दिव्या नाइकने पुण्याहून अंधेरीसाठी 21 फेब्रुवारीला उबर कॅब बूक केली होती
  • तिने याप्रकरणातील फोटो-व्हिडीओ शेअर केले, कंपनीने मागतली माफी

​​​पुणे- सध्या अनेकजण आपल्या सोईसाठी आणि आरामात प्रवास करण्यासाठी कॅब बूक करतात. पण, पुण्यातील एका महिलेला कॅब बूक करुन वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले.


पुण्याहून सुमारे 150 किमी दूर मुंबईला जात असलेल्या महिलेने उबर कॅब बूक केली होती. पण, ड्रायव्हरला कार चालवताना झोप येऊ लागल्यामुळे नाईलाजाने महिलेला स्वतः कॅब चालवून मुंबईला यावे लागले. घटना 21 फेब्रुवारीची आहे. महिलेने आता या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे आता उघडीस आली. 


28 वर्षीय तेजस्विनी दिव्या नाइकने याबाबत सांगितले की, ‘मी पुणे ते अंधेरी (मुंबई) साठी उबर कॅब बूक केली होती. सुरवातीला ड्रायव्हर बराचवेळ फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलण्यास रोखले. त्याने फोन ठेवला तर त्याला झोप येऊ लागली. एकदा तर अपघात होता होता वाचला. मी ड्रायव्हरला म्हणाले, जर त्याला झोपायचे असेल तर झोप थोडावेळ मी ड्राइव्ह करते. आधी तर तो नाही म्हणाला पण नंतर मी स्टीअरिंग सांभाळले." 

तक्रार केल्यामुळे ड्रायव्हर सस्पेंड, कंपनीने मागितली माफी... 

तेजस्विनी म्हणाली, ‘जेव्हा अर्ध्या तासाचा प्रवास उरला तेव्हा ड्रायव्हरला जाग आली आणि मग त्याने कार चालवली. उबरकडे तक्रार केली तर ईमेलवर उत्तर आले की, ड्रायव्हरला कंपनीने सस्पेंड केले आहे. उबरने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली.’ तेजस्विनीनुसार, तिने पुरावा म्हणून ड्रॉयव्हरचे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवला होता. तेजस्विनी एक लेखिका आहे आणि चित्रपटांसाठी कथा लिहिते.