आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित आघाडी अपयशी, आता आमचा वेगळा मार्ग : आनंदराज आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसल्याने आपण आता वेगळी वाटचाल करू पाहत असून आंबेडकरी समाज एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आहाेत. वंचितमध्ये प्रकाश आंबेडकरांसाेबत असलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी नेते हाेते का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे यापुढे रिपब्लिकन सेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जे मित्र पक्ष जवळ येतील त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत जाण्याचा प्रयत्न करू, असे मत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनासाठी आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. इंदू मिलचा ताबा, कोरेगाव भीमा व वंचितचा प्रयोग या विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. रिपब्लिकन सेनेने आता सत्तेेचे राजकारण करण्याचे ठरवले आहे. राजकारणात कोण मित्र आणि कोण शत्रू हे ओळखणे कठीण असले तरी युद्धात सर्व काही माफ या तत्त्वानुसार वाटचाल करायची ठरवले आहे.  मित्र पक्ष म्हणून जे जवळ येऊ शकतील त्यांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...