आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नाव प्रकरणात न्यायाची आस : पीडितेचे नाव ठाऊक नव्हते म्हणून कळवण्यास विलंब झाला - सचिव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - उन्नाव अत्याचार प्रकरणात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पीडितेला न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठाने या प्रकरणात सुनावणी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून सेक्रेटरी जनरल यांनी सरन्यायाधीशांना पीडितेचे पत्र पोहोचवण्यातील विलंब जाणूनबुजून केला नसल्याचे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे दर महिन्याला ५ हजार पत्र येतात. जुलैमध्ये रजिस्ट्रीकडे ६ हजार ९०० पत्रे आली होती. त्यापैकी १ हजार १०० पत्र याचिकांशी संबंधित होते. या पत्रांचे वर्गीकरण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केले जाते. प्रसारमाध्यमांतून पीडितेचे पत्र मिळाल्याची माहिती सरन्यायाधीशांना मिळाली तेव्हा रजिस्ट्री कार्यालय मिळालेल्या पत्रांच्या प्रक्रियेत गुंतलेले होते. तोपर्यंत आम्हाला पीडित व तिच्या आईचे नाव देखील माहिती नव्हते. आम्ही पत्र शोधून सरन्यायाधीशांपर्यंत पोहोचवले. वास्तविक १२ जुलै रोजी सरन्यायाधीश गोगोई यांना पीडितेने पत्र लिहून सुरक्षा मिळावी, अशी विनंती केली होती. धमकी देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचीही तिने मागणी केली होती. लोक घरी येऊन केस मागे घ्यावी अन्यथा खोट्या केसमध्ये आयुष्यभर तुरुंगात डांबण्याची धमकी देत आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राबद्दल सरन्यायाधीशांना माहिती देण्यात आली नव्हती.  
 

१ वर्षातील तिसरे मोठे प्रकरण स्थलांतरित

जुलै २०१८ : कठुआ प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने कठुआ अत्याचार प्रकरणी आरोपी कठुआ तुरुंगातून गुरुदासपूरला रवाना, सुनावणीही पठाणकोटला. 
 

फेब्रु. २०१९ : मुझफ्फरपूर 
सर्वोच्च न्यायालयाने मुझफ्फरपूर बालिकागृह लैंगिक अत्याचाराची सुनावणी विशेष पॉक्सो कोर्टाऐवजी दिल्ली कोर्टात स्थलांतरित केली
 

सुरक्षेत दुर्लक्ष : प्राथमिक तपासात तैनात शिपाई दोषी, तिघे निलंबित : एसपी
> गुरुवारी उन्नावचे पोलिस अधीक्षक म्हणाले, तैनात शिपाई सुदेश कुमार, रुबी पटेल व सुनीता देवी यांना दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली निलंबित केले. सीबीआय चौकशीही सुरू.
> पोलिस अधीक्षक माधव प्रसाद वर्मा म्हणाले, प्राथमिक तपासात हे सर्व ड्युटीवर गेले नव्हते. त्यांची वागणूक बेजबाबदारपणाची होती. 
> तैनात पोलिसांनी सुट्टीची माहिती वरिष्ठांपासून दडवून ठेवली होती. ते ड्युटीवर का गेले नव्हते, याची चौकशी सुरू आहे. 
> साक्षीदार अद्यापही रुग्णालयात आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यास विलंब होतोय. पीडिता रेल्वेने प्रवास करत असती तर पोलिस तिच्यासोबत राहिले असते. 
> उन्नाव प्रकरणात पीडितेच्या काकीवर गुरुवारी अंत्यसंस्कार झाले. त्यांचा २८ जुलै रोजी रायबरेलीत कार अपघातात मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...