आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळ्यात मासे पकडताना मासेमाराला सापडला पुरातन हंडा, त्यात होत्या अशा वस्तु की, पोलिसांनी लगेच घेतल ताब्यात...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाराबंकी(उत्तर प्रदेश)- बाराबंकीतील तळात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाच्या हाती लागला पुरातन हंडा, त्यात सोन्या-चांदिचे दागिणे आणि नाणे होते. आधीतर युवकाने ते भांडे घरी लपवले, पण अचानक त्याला रात्री भिती वाटली म्हणून त्याने ते भांडे मंदिरात ठेऊन पुजा-पाठ सुरू केला. खाजिना मिळाल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर पोलिसांनी ते सगळे दागिण आणि हंडा ताब्यात घेतले. 


काय आहे प्रकरण ? 
घटना बाराबंकीच्या घुंघटेर परिसरातील सैंदर गावची आहे. येथे राहणारा लल्लाराम यादवला सोमवारी गावाच्या बाहेरील तळ्यात मासे पकडताना पुरातन हंडा मिळाले, ज्याला तो घरी घेऊन गेला. हंडा उघडून पाहिल्यावर त्यात त्याला सोन्या-चांदिचे दागिण आणि नाणे मिळाले. त्यानंतर त्याने तो हंडा घरातच लपवला, पण रात्री त्याला झोपेत अचानक भंयकर स्वप्न पडले आणि तो घाबरला. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवश त्याने तो हंडा मंदिरात नेला आणि पुजा सुरू केली, ते पाहून सगळे लोक जमा झाले आणि खजिना मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पलरली. त्यानंतर पोलिसांनी ते सगळे सामान जप्त केले.


पोलिस काय म्हणाले ?
घुंघटेर पोलिस आधिक्षक संतोष कुमार यांनी सांगितले, हंड्यात फक्त चार चांदिचे नाणे आणि काही पीतळ्याचे भांडे मिळाले आहे. सध्या सामानाला सुरक्षित ठेवून पुढील तपास चालू आहे. पुरानत विभागाकडूदेखील याची तपासणी केली जाईल, पण गावातील लोकांचे म्हणने आहे की, त्यात अंदाजे 3 किलो सोने-चांदि होते.

 

बातम्या आणखी आहेत...