आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींनी उडवून दिलेल्या शाळेची ग्रामस्थांनी पुन्हा केली उभारणी, १२६ मुले घेत आहेत शिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भिलाई : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पोलमपल्ली गावातील शाळा सर्वांसाठी आदर्श बनली आहे. १३ वर्षांपूर्वी नक्षलींनी या गावातील एकमेव असलेल्या माध्यमिक शाळेला स्फोटकांनी उडवून दिले होते. तेव्हा पंचक्रोशीतील १०० गावांतील शाळांनाही नष्ट करण्यात आले होते. ही उद्ध्वस्त शाळांची २००६ ची कहाणी होती. शाळा नसल्यामुळे मुले शाळेत जाऊ शकत नसत. मात्र गावातील लोकांनी २००८ मध्ये एका तंबूत शाळा सुरू झाली. पण ती पावसाळ्यात बंद पडत असे. तेव्हा नक्षलींच्या भीतीने शिक्षकही नियमित येत नसत. त्यामुळे आशेवर पाणी फेरले जात होते. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मदतीचा आग्रह धरला. पण उपयोग झाला नाही. मग बांबू-काठ्यांच्या मदतीने शाळा पुन्हा उभारण्यात आली. २०१२ मध्ये सीआरपीएफच्या मदतीने १५ खोल्यांची शाळा तयार झाली. मुलांना सुरक्षा मिळाली होती. मग काय..पाहता-पाहता ही शाळा मुलांनी गजबजून गेली. आता या शाळेत १२ वीपर्यंत शिक्षण मिळते. हेच मॉडेल सरकारनेही स्वीकारले आहे. आतापर्यंत या शाळेच्या धर्तीवर चार जिल्ह्यांत ६३ शाळांच्या इमारती तयार करण्यात आल्या आहेत. 


 बांबूपासून बनवलेल्या शाळांच्या उभारणीला ५० हजारांचा खर्च 
पोलमपल्लीमध्ये बांबूच्या काठ्यांनी शाळा उभारण्याच्या संकल्पनेस सरकारने प्राेत्साहन दिले आहे. सरकारने २०१४ च्या प्रकल्पात त्याचा समावेश केला. २०१५ पासून आतापर्यंत या प्रतिमानावर आधारित ६३ इमारती तयार झाल्या. त्यात बस्तरमधील बिजापूर-२८, दंतेवाडा-१७, नारायणपुरा-२, सुकमा-१६ शाळा आहेत. मुलांच्या सुरक्षेसाठी बहुतांश शाळा सीआरपीएफच्या तळाजवळ उभारण्यात आल्या आहेत. एक शाळा बांधण्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च येतो. बांबू-काठ्या गावातून मोफत मिळाले. श्रमदानातून पैशांची बचत झाली. फर्निचर, शिक्षकांसह इतर व्यवस्था शिक्षण विभाग करतो. 

बातम्या आणखी आहेत...