Home | National | Other State | The villagers divided the road of their village into two areas, the first part was Sheikh and the other Ansari

गावकऱ्यांनी आपल्याच गावचा रस्ता दोन भागात विभागला, पहिला हिस्सा शेख तर दुसरा अन्सारीकडे

गुलशाद | Update - Dec 09, 2018, 09:01 AM IST

मुझफ्फरपूरच्या पानापूर हवेली पंचायतमध्ये दामोदरीवाले इस्लामचा संदेश जाणत नाहीत

 • The villagers divided the road of their village into two areas, the first part was Sheikh and the other Ansari

  मुजफ्फरपुर- एकाच रांगेत महंमद व अय्याज उभे ठाकले. कोणी बंदा राहिला ना कोणी बंदा नवाज. इस्लाममध्ये जात व उच्च-नीच असे स्थान नाही. हा संदेश कांटी भागातील पानापूर हवेली पंचायतच्या दामोदरीतील लोकांना कळला नाही. ७७ उंबरठ्याचे हे गाव शेख आणि अन्सारी यांच्या द्वेषाच्या आगीत होरपळून निघाले आहे. गावातील लोकांमध्ये द्वेष इतका ठासून भरला आहे की, त्यांनी सार्वजनिक रस्त्याचीसुद्धा विभागणी केली आहे. अर्ध्या रस्त्यावर अन्सारी यांची व अर्ध्या रस्त्यावरून शेख यांची भावकी चालतात. रस्त्यावर भिंत बांधण्यात आल्याने गावात वाहने शिरू शकत नाहीत. गेल्या १७ नोव्हेंबर रोजी बशिरमियां यांच्या लहान मुलाचे लग्न हाेते. मारहाण झाली. त्यानंतर शेख व अन्सारी यांच्यात वाद पेटला.

  मनाला वाटले म्हणून रस्ता, सुरक्षेसाठी आता भिंत बांधली
  महंमद अन्सारी म्हणाले, रस्ता सरकारी नाही. १५ वर्षापूर्वी मला वाटले रस्ता करावा, म्हणून तो बांधला. आता आम्ही गावाबाहेर राहतो. घरावर शेख आम्हाला खालच्या जातीचे म्हणतात व मारहाण करतात. म्हणून सुरक्षेसाठी ही भिंत बांधली.

  आमचे कुराण एकच, काही लोक पसरवत आहेत द्वेष
  शेख समाजाचे महंमद सलिम म्हणाले, आमचा खुदा एक, नबी एक व कुराणही एकच आहे. गेल्या अनेक दशकांपासून दस्तरखानावर जेवलो आहोत. परंतु काही लोक द्वेष पसरवत आहेत. ५० कुटुंबांचा रस्ता बंद केला आहे. मशिदीत जाता येत नाही.

  इस्लाममध्ये लहानथोर असे स्थान नाही : काझी-ए-शहर
  काजी-ए-शहर मुफ्ती शमीमुल कादर यांनी सांगितले, इस्लाममध्ये अंत:करणात द्वेष बाळगणे गुन्हा आहे. त्याला माफी नाही. नबी-ए-पाक कोणाला त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावरील काटे व दगड वेचून काढून टाकत असत. द्वेष पसरवणाऱ्यांना अल्लाची भिती वाटायला हवी.

  हे प्रकरण खूप गंभीर आहे. याची चौकशी केली जाईल. सार्वजनिक रस्त्यावर भिंत बांधणे चुकीचे आहे. या समस्येकडे जरुर लक्ष देऊ -महंमद सोहेल, डीएम, मुझफ्फरपूर

Trending