आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉइस मेसेजिंग प्लॅटफॉर्म वाढले, टाइप करण्यापेक्षा चौपट वेग असल्याने मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक ऑडिओ स्टेटसवर वेगाने काम करते आहे. तत्पूर्वी दुसऱ्या मोठ्या कंपन्या व्हॉइस मेसेजिंग सेवा सुरू करत आहेत. दुसरीकडे रोज नवनवे स्मार्ट स्पीकर लाँच होत आहेत. त्यामुळे व्हॉइस कमांडला दूरसंचार क्षेत्रातील पुढील क्रांती म्हटले जाऊ लागले आहे. त्यामुळे आपले जीवन कसे बदलेल हे सांगत आहेत कुमार रंगाराजन. कुमार यांची कंपनी लिटिल आय लॅब्ज फेसबुकने विकत घेतली आहे. 

 

टाइप करण्यास जितका काळ लागतो, त्यापेक्षा चौपट वेगाने लोक व्हॉइस मेसेज पाठवत आहेत, अशी माहिती लिंक्डइनने आपल्या अधिकृत ब्लाॅगवर दिली आहे. यामुळे अधिक क्लिष्ट अथवा गुंतागुंतीची माहिती व मोठे संदेश कमी वेळेत सहज पाठवू शकता. तुम्ही बाहेर असाल तर असे मेसेज टाइप करत बसण्याची गरज नाही. यामुळे जगातील जवळपास सर्वच मोठ्या कंपन्या ऑडिओ फीचरचे काम करत आहेत. देशात दर तीनपैकी दोन नवे इंटरनेट युजर्स श्रेणी-२ आणि श्रेणी-३ शहरांतील आहेत. यातील बहुतांश लोकांना मातृभाषेत लिहिणे-वाचणे सोपे जाते. अशा  युजर्ससाठी व्हॉइस टेक्नॉलॉजी खूप साह्य करते. देशात गुगल हिंदी सर्च दर वर्षी ४०० टक्के वेगाने वाढतो आहे. गेल्या वर्षी सर्व मोठे सर्च अॅप्सवर सर्च असा उच्चार करून करण्यात आले आहेत. 
भारतीय युजर्ससाठी व्हॉइस कम्युनिकेशन आज खूप महत्त्वाचे ठरले आहे. आज सुमारे १.२ अब्जांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त १० टक्के लोकांना इंग्रजी समजते, तर ज्यांना चांगली इंग्रजी येते त्यांच्यासाठी जितके अॅप स्मार्टफोनसाठी डिझाइन होत आहेत, ते ६ ते ८ कोटी लोकांसाठी खूप जास्त उपयोगी पडत आहेत. आपल्याकडे भारत लँग्वेज नावाने संशोधन सुरू आहे. त्यानुसार एक स्क्रिप्ट तयार केली जात आहे. त्यायोगे सर्व भाषांमधून ट्रान्स्क्राइब (बोलून टाइप) करता येऊ शकते. पुढील काही वर्षांत व्हॉइस फीचरमुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. बहुतांश प्रकरणांत व्हॉइस फीचर्सची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. आज घरांत अमेझॉन इको व गुगल होम यांसारखे स्मार्ट स्पीकर स्थान निर्माण करत आहेत. येत्या ५ ते १० वर्षांत घरातील बल्बपासून टोस्टर आणि मिक्सरसुद्धा व्हॉइस तंत्रज्ञानाशी जोडले जाईल. भारतात मीहप, ग्नानी यांसारख्या कंपन्या भारतीय भाषांना सपोर्ट करतात. स्लॅग लॅब्ज अॅप्सचा व्हॉइस एक्सपिरियन्स उत्तम करण्यासाठी असे प्लॅटफॉर्म तयार करत आहे, तर व्हॉइस कम्युनिकेशनमध्ये अजूनही काही आव्हाने आहेत. उदा. वेगवेगळ्या भाषांतून बोलणे अथवा टोनला सॉफ्टवेअरने १०० टक्के समजून घेणे, शब्दांचे अर्थ समजणे इत्यादी. 

 

या मोठ्या कंपन्यांनी केले व्हाॅइस मेसेजिंगवर काम

गेल्या काही वर्षांत फक्त व्हाॅइस सेवा देणारे सोशल मिडिया प्लॅटफार्म वाढले आहेत. उदा: हिअरमीआउट, लिसेन, व्हाॅइस आदी. त्याशिवाय मोठ्या कंपन्याही त्यावर काम करत आहेत.
 

इन्स्टाग्राम : एक मिनिटाचे मेसेज पाठवण्याचे फीचर
इन्स्टाग्रामने सुमारे सहा महिन्यांपूर्वीच व्हॉइस मेसेजिंगला आपले फीचर जोडले आहे. याद्वारे युजर्स खासगी अथवा ग्रुप चॅटवर ऑडिओ मेसेज पाठवू शकतो. याआधी फेसबुक, व्हीचॅट आणि व्हॉट्सअॅपवर ही सुविधा खूप आधीपासून सुरू आहे. 
 

 

फेसबुक : व्हॉइस क्लिप फीचर चाचणी करत आहे
फेसबुक खूप आधीपासून “अॅड व्हॉइस क्लिप’ फीचरची चाचणी करत आहे. गेल्या वर्षी भारतात याची चाचणी घेण्यात आली. अजून ते लाँच झालेले नाही. युजर याच्या मदतीने ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून आपले स्टेटस अपडेट करू शकतो. 
 

 

लिंक्डइन : प्रोफेशनल्सकडून आवाजाशी जोडण्याचा पर्याय
प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग वेबसाइट लिंक्डइनने व्हॉइस मेसेजिंगची आवश्यकता जाणून गेल्या वर्षी ऑडिओ मेसेजिंगचे फीचर जोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...