आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : 'लै जा..लै जा रे...', 'मुझसे दूर कहीं न जा', 'बस यहीं कहीं रह जा', 'दिलबर', 'वास्ते' आणि गुरु रंधावासाेबत सुपरहिट गाणी देणारी युवा गायिका ध्वनि भानुशालीचे पुन्हा एक गाणे रिलीज झाले आहे. टी सिरीजसोबत तिचे नवे गाणे न जा तू दूर अंखियों से' रिलीज झाले.
ध्वनीचे गीत वास्ते' २०१९ मध्ये यूट्यूबच्या टॉप टेन गाण्यात सामिल झाले होते. याविषयी ध्वनी सांगते, कोणतेही गाणे माझ्यासाठी माइलस्टोन ठरू शकत नाही, एका पाठोपाठ एक चांगले गाणे देण्याचा माझा प्रयत्न असतो. गाणे हिट झाले तरी मी हुरळुन जात नाही, मी फक्त नाॅर्मल राहते. जेव्हा दुसरे लोक कौतुक करतात तेव्हा विचार करते, खरचं चांगले झाले का ? ध्वनी सांगते, कोणत्याही गाण्याच्या हिट होण्यामागे टीमची मेहनत असते. त्याचा दीर्घ प्रवास असतो. न जा तू दूर अखियों से कि नई जाना, नई जाना' गाण्याला एक वर्षे लागले होते.
आजकाल कोणतेही काम सोपे राहिले नाही, सिंगल अलबमचे गाणेदेखील खूप आव्हानात्मक असते. कारण त्यासाठी संगीत, गाण्याचे बोल आणि गाण्यात तीन मिनिटाची छोटीसी कथा हवी असते. जे अवघड काम आहे.
हे गाणे ब्रेकअपचे आहे. यात एक मुलगा एका रिअॅलिटी शोमध्ये संधी मिळाल्यामुळे आपल्या बालपणीचे प्रेम विसरून जातो तिला सोडून देतो. त्यामुळे मुलगी मुलासाठी रडते, मात्र एक दिवस रडत बसण्यापेक्षा आपले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेते. त्यानंतर ती पायलट बनते. गाण्यात रणचे कच्छ, भुज आण मांडवी बीचचे दृश्य आहेत. याविषयी ती सांगते, सध्या सिंगल एलबमचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात मला पॉप सिंग बनायचे आहे.
भारतात संगीत उद्योगाची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी असे मला वाटते, असे ध्वनी म्हणते. आपली खूप मोठी इंडस्ट्री आहे, याला मान्यता मिळायला हवी, अनकेदा निराशा येते मात्र त्याचा पश्चाताप वाटत नाही. मी माझ्या मर्जीने सर्व काही करते त्यामुळेदेखील मला पश्चाताप वाटत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.