आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा क्षेत्र निर्देशांकात सलग दाेन महिने घसरणीचा सूर    

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : देशातील सर्वात भक्कम मानल्या जाणाऱ्या सेवा क्षेत्रावरही घटलेल्या मागणीचा परिणाम झाला आहे, सलग महिन्यात ऑक्टाेबरमध्येही सेवा उद्याेगातील घडामाेडीत घट झालेली दिसून आली. एका सर्वेक्षणानुसार सणासुदीच्या हंगामातील मागणी कमी झाल्यामुळे घडमाेडीमध्ये घट झाली व याच कालावधीत व्यावसायिक अपेक्षा (बिझनेस ऑप्टिमिझम) देखील घसरून तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. परंतु या कालावधीत आयएचएस मार्केट सर्व्हिस पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्समध्ये किरकाेळ वाढ बघायला मिळाली.


सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक ४८.७ वर हाेता ताे ऑक्टाेबरमध्ये वाढून ४९.२ वर गेला. परंतु ताे ५० स्तराच्या खाली आहे. याआधी ऑगस्ट २०१७ दरम्यान सलग दाेन महिने सेवा क्षेत्रात घसरण झाली. त्या वेळी सरकारने जीएसटीची अंमलबजावणी केली हाेती. गेल्या महिन्यात नवीन व्यवसायात मुश्किलीने वाढ झाल्याचे या निर्देशांकावरून कळते. या आधी उत्पादन क्षेत्रातही मरगळीचे वातावरण हाेत त्याचाही परिणाम झाला आहे.. भारतातील उत्पादन निर्देशांक घसरून दाेन वर्षांच्या ४९.६ या नीचांकी स्तरावर आला आहे.

मागणी कमी झाल्याने उत्पादन खर्च वेगाने वाढल्याने नफ्यात झाली घसरण
व्यावसायिक अपेक्षा डिसेंबर २०१६नंतर नीचांकी स्तराव

आयएचएस मार्केटचे मुख्य अर्थतज्ञ डि.लामा यांच्या मते, भारतीय सेवा क्षेत्रातील घट हे चिंतेचे कारण आहे. मागणी कमी झाल्याने व्यापारी घडामाेडी कमी झाल्या आहेत. पण त्याचबराेबर गुंतवणूक आणि राेजगारामुळे कमी झालेला व्यावसायिक आत्मविश्वास व त्यानंतर भविष्यात लक्ष्यात कपात करणे हा चिंतेचा विषय आहे. व्यावसायिक अपेक्षा (बिझनेस ऑप्टिमिझम) डिसेंबर २०१६नंतर नीचांकी स्तरावर आला आहे. नव्या नाेकऱ्यांमधील वाढीचा दरही दाेन वर्षांच्या नीचांकी स्तरावर आला आहे.

मागणी कमी झाल्याने इनपुट खर्चातही वेगाने वाढ
सर्वेक्षणानुसार अलीकडेच सरकारच्या दिलासा उपाययाेजना आणि रेपाे दरातील कपातीचा अर्थव्यवस्थेवर फार कमी परिणाम झाला आहे. व्यावसायिक घडामाेडी वाढवण्यासाठी आरबीआयने आतापर्यंत रेपाे दरात १३५ % अंकांची कपात केली आहे. त्याचबराेबर सरकारने कंपनी कर कपातीसारखे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मागणी कमी झाल्याने इनपुट खर्चातही वेगाने वाढ झालेली आहे. त्याचे प्रमाण एका वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.

पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) म्हणजे काय
पर्जेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) एक संमिश्र निर्देशांक असताे. याचा उपयाेग उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केला जाताे. हा वेगवेगळ्या व्यवसायांच्या बाबींवर व्यवस्थापकांच्या मतांच्या आधारावर तयार हाेताे. त्यामध्ये हजाराे व्यवस्थापकांकडून उत्पादन, नवीन ऑर्डर, उद्याेगांच्या आशा व अपेक्षा व राेजगाराशी संबंधित मते अजमावली जातात. व्यवस्थापकांना मागील सहा महिन्यांच्या तुलनेत नव्या स्थितीवर आपले मत व मानांकन देण्यास सांगितले जाते. ज्या अाधारावर प्रत्येक महिन्याला प्रकाशित केला जाताे. पीएमआयमध्ये ५० आकडा आधार मानला आहे. ५० च्या वर आकडा असेल तर व्यावसायिक घडामाेडींचा विस्तार हाेत असल्याचे तर ५० च्या खाली आकडा असेल तर व्यावसायिक घडामाेडीत घसरण मानली जातेे.

बातम्या आणखी आहेत...