आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांना भाजपचे सरकार नकाेच हाेते, मात्र आपण कमी पडलाे : पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'काहीही होवो, पण या वेळी राज्यात भाजपचे सरकार नको आहे, अशी युवक, शेतकरी आणि अल्पसंख्याक समाजात तीव्र भावना मला दिसत होती. शेतकऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला. मात्र काही ठिकाणी आपण कमी पडलो', अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या बैठकीत दिली. दलित व नवबौद्ध वर्ग वंचित बहुजन आघाडीकडे गेल्याने त्याचा मोठा फटका निवडणुकीत बसला. आता अापल्या कामाने हा समाज पुन्हा अापल्याकडे कसा येईल हे पाहिले पाहिजे,' असे आवाहन त्यांनी केले.


पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी आयाेजित बैठकीत ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, 'निवडणुकीचा निकाल संमिश्र लागला. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज असल्याचे मतदारांनी लक्षात आणून दिले आहे. तुम्हाला यश आले नाही. त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. माझ्या पक्षातील कार्यकर्ता पक्षाचे काम करत नाही. विरोधी पक्षाचे काम करतो, अशा वेळी स्वतः चे काम तपासून घ्यायला हवे', अशी कबुली देत पवार यांनी 'गयारामांचे काही चुकले नाही', असे स्पष्ट केले. 'संघटनात्मक कामात आपण जिथे कमी पडलो. त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्ह्यात वर्षानुवर्षे एकाकडेच पक्षाची जबाबदारी आहे. तिथे नव्यांना संधी दिली पाहिजे, असे सांगत तरुणांना पक्षात संधी देण्याचे संकेत त्यांनी दिले. मुंबई व ठाणे जिल्ह्यात जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस हे शाेलेतील गब्बर : भुजबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था शोलेतील गब्बरप्रमाणे झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तर सातारचे नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील यांनी २०२४ च्या तयारीला लागा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. थोड्या फरकाने पराभव झालेल्या उमेदवारांनी आपल्या पराभवाची कारणमीमांसा या बैठकीत केली.
 

बातम्या आणखी आहेत...