आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे हिंगोलीच्या पंचायत समिती कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली  - येथील पंचायत समिती कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना मंगळवारी (दि.९) दुपारी १२ च्या सुमारास घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी भिंतीलगत उभ्या करण्यात आलेल्या आठ दुचाकींचे यात नुकसान झाले असून ही संरक्षण भिंत मागील दोन दिवसांपासून अधून-मधून कोसळत असलेल्या पावसाच्या सरीमुळे भिजल्याने कोसळल्याचा अंदाज लावला जात आहे.


पंचायत समिती आणि जिल्हा न्यायालयाच्या मध्ये असलेली संरक्षण भिंत अनेक वर्षे जुनी आहे. तिला तडेही गेले होते. त्यातच दोन दिवसांपासून अधून-मधून सुरू असलेल्या पावसाच्या सरीत ही भिंत भिजल्याने कोसळली. त्यावेळी पंचायत समिती आणि न्यायालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी आपल्या दुचाकी भिंतीलगत उभ्या केल्या होत्या. त्यातील आठ ते दहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच भिंतीलगत असलेल्या वृक्षांचेही नुकसान झाले आहे. भिंत कोसळली तेव्हा सुदैवाने तेथे कुणीही नव्हते. त्यामुळे जीवित हानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. भिंतीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या दुचाकी मालकांकडून पंचनामा करण्याची मागणी होत होती. त्यानंतर पंचायत समिती, तहसीलच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...