आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

125 वर्षांच्या मगरीच्या अंत्ययात्रेत संपूर्ण गावाला अश्रु अनावर, खायची वरण-भात, ट्रक्टरमधून काढण्यात आली अंत्ययात्रा ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेमेतरा(छत्तीसगढ)- जिल्ह्यातील एक गाव आहे बवामोहतरा, येथील एका तलवातील मगरीचा मृत्यु झाला, त्यामुळे पूर्ण गावाला अश्रु अनावर झाले. गावाच्या तळ्यात राहणाऱ्या 'गंगाराम' नावाच्या मगरीसोबत लोकांचे खुप जवळचे संबंध होते. गावातील लोक गंगारामला घरातील वरण-भात खायला द्यायचे आणि तीही खुप आवडीने ते खायची. मंगळवारी गंगारामचा मृत्यु झाला, त्यानंतर संपूर्ण गाव त्याच्या अंत्यदर्शनासाठी आले.

 

मंगळवारी सकाळी अचानक गंगाराम पाण्याबाहेर आली, मासेमारी करणाऱ्या लोकांनी तिला जवळ जाऊन पाहिले तेव्हा तिचे निधन झाले होते. त्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांनी तिला पाण्याच्या बाहेर काढले आणि ट्रक्टरवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. दुरवरून लोक तिच्या अंत्यदर्शनासाठी येऊ लागले.


कधीच कोणाला नुकसान पोहचवले नाही
इतरवेळस तलावात मगर आल्याच्या बातमीने लोक तळ्यात जाणे बंद करतात पण गंगारामसोबत असे झाले नाही. तिने कधीच कोणाला नुकसान नाही पोहचवले. इतकच काय तर नेहमी लोक तळ्यात पोहायला जायचे तेव्हा गंगारामसोबत त्यांची टक्कर व्हायची, तेव्हा ती दुर निघूण जायचा पण कोणावरच हल्ला केला नाही. तळ्यातील मासे हाच फक्चत तिचा आहार होता.


आठवणीत बांधणार मंदीर
गावातील लोकांचे म्हणने आहे की, गंगारामसोबत त्यांचे अनेक वर्षांपासूनचे नाते होते. ती फक्त एक मगर नसून त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे होती. तिच्या आठवणीत मंदीर बांधण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...