आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Wife Is Gone, The Girlfriend Is Gone, Then He Becomes A 'serial Killer', After The Murder A Mark Of The Person Is Kept Close By.

पत्नी निघून गेली, प्रेयसीने साथ साेडली, नंतर ताे बनला 'सीरियल किलर', खुनानंतर त्या व्यक्तीची एखादी खूण जवळ ठेवायचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरेली : पत्नी आणि प्रेयसीशी संबंध बिघडले अन् तो खुनी झाला. प्रेमसंबंध नाकारल्याने सीरियल किलर बनलेल्या मिलन राठाेड या व्यक्तीला गुजरातच्या अमरेली पाेलिसांनी अटक केली आहे. त्याने एक-दाेन नव्हे तर तब्बल पाच जणांची हत्या केली आहे. १९ वर्षांच्या कालावधीत त्याने हे सर्व गुन्हे केले आहेत. आराेपी कापसाचा दलाल आहे. पहिल्या घटनेमध्ये त्याने २००१ मध्ये आपली काकू शातुबेनची हत्या केली हाेती. आराेपी दाेन मुलांचा पिता आहे. पत्नीशिवाय त्याचे एका महिलेबराेबर प्रेम सुरू हाेते. पण दाेघांचे संबंध बिघडल्यावर त्याने हत्या करणे सुरू केले. वास्तविक एकदा नाराज हाेऊन माहेरी गेलेली त्याची पत्नी नंतर घरी येऊन त्याच्याबराेबर राहू लागली हाेती. आराेपी मानसिकदृष्ट्या इतका भयभीत झाला हाेता की त्याने तिचाही बळी घेतला. पण तिची एक निशाणी ताे जवळ ठेवायचा. मनाची बेचैनी खूप वाढली की ताे त्या वस्तूंना बघून आनंदित व्हायचा. सामान्यत: विशिष्ट कालावधीने किंवा विशिष्ट पद्धतीनुसार तीन किंवा त्यापेक्षा जास्त हत्या करणाऱ्यांना पाेलिस सीरियल किलर मानतात.

असा झाला जेरबंद...
रेकीमध्ये सीसीटीव्हीपासून बचावाच्या प्रयत्नात झाली अटक
गुन्हा करण्याच्या आधी आराेपी पहिल्यांदा आपली शिकार व त्यांच्या घरी जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यांची पूर्ण रेकी करायचा. हे करताना रस्त्यावर सीसीटीव्ही आहे की नाही हे निरखून बघायचा. अमरेलीच्या हडिडा भागात २४ सप्टेंबरला त्याने गुन्हा केला. पण त्या वेळी त्याने केलेल्या हालचाली त्या व्यक्तीच्या घरात लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. त्यामुळे पाेलिस त्याच्यापर्यंत पाेहोचू शकले. आराेपीने सर्व गुन्हे भावनगर आणि अमरेली जिल्ह्यात केले आहेत. त्यात तीन तरुण, एक मुलगा व एक वृद्धेचा समावेश आहे.