आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदुषी ट्विंकल खन्ना व अभिव्यक्तीचा नवा मंच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षयकुमारची बायकाे ट्विंकल खन्ना विविध विषयांवर लेखन करते, तिचा कॉलम ‘फनी बोन्स’ नावाने प्रकाशित होताे. त्यांची ‘लिजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पजामा आर फॉरगिविंग’ ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आता त्या इंटरनेटवरही लिहिणार आहेत. गुरुदत्तचा  ‘साहब, बीवी और गुलाम’ मध्ये जमिनदारांच्या अन्य सुनांप्रमाणे अलंकार माेडा आणि अलंकार बनवा कारण वेळ व्यतीत करण्यासाठी काहीतरी काम हवे, असा वेळ वाया घालविणे ट्विंकलला पसंत नाही.  त्यांनी आपल्या कथेत आई, पती, पाळीव कुत्री आदी पात्रे घेतली आहेत, ज्यांचा मूळ नात्यांशी काही संबंध नाही. आपल्या घराच्याबाहेर त्या या घरातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत, असेही लिहू शकतात जसे इंदोरच्या ‘विभावरी संस्थेच्या’ बाहेर लिहिले आहे. ट्विंकलने बॉबी देओलसोबत ‘बरसात’च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच शाहरुख खानसोबत ‘बादशाह’मध्ये अभिनयही केला. चित्रपटसृष्टीत त्यांची चलती असूनही अशा काल्पनिक भूमिकात त्यांना रस नसल्याने त्यांनी यातून संन्यास घेतला. त्यांचे वडील राजेश खन्ना व आई डिंपल हे खूप लोकप्रिय कलावंत होते, तर आईने काही ठराविकच चित्रपटात काम केले. त्यांनी ‘पटियाला हाउस’ आणि आणखी एका चित्रपटात ऋषि कपूरसोबत काम केले. तसेच त्यांनी अनीस बज्मीच्या  ‘वेलकम’ साखळी चित्रपटातही काम केले आहे. कमकुवत बुद्धीचा वीट आल्याने बहुधा ट्विंकलने संन्यास घेतला असावा.   अक्षयचे ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ यातील कथातही त्यांच्या विचारांची छाप आहे. यशस्वी पुरूषाच्यामागे स्त्रीचा हात असतो ही म्हण त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली आहे, पण स्त्रीच्या बाबतीत असे नाही. आपण काहीवेळेस विचार न करता काही गोष्टी स्विकारतो. स्त्रियांना समान अधिकार मिळू नयेत म्हणून अनेक कथा रचल्या गेल्या आहेत. यासाठीच बहुतेक आणि आरशाची निर्मिती केली आहे, ज्यात पहात स्त्रिया या भानगडीपासून अलिप्त राहतात. पुरुषांनी मनमानी केली पण यातही स्त्रीची मुकसंमती असल्याचे त्याला माहीत नाही. याचा ‘शी स्टूप्स टू कॉन्कर’ या नाटकातून खुलासा ही करण्यात आला आहे. कधीकधी मूर्खपणाचा अभिनय करणे ही लाभाचे असते. यावर कुमार अंबुज म्हणतात मूर्खपणा हा प्रत्येक गोष्टीवर गर्व करतो, त्यात जात, निरक्षरता आणि इतिहासाचाही समावेश आहे. आजकाल आपणास हवा तसा इतिहास लिहिला जातोय व भुगोल विषयातही आक्रमणे, आतंकवाद आणि घुसखोरीच्या माध्यमातून हस्तक्षेप केला जातोय.  अभिनेत्यांच्या पत्नी किटी पार्टी आयोजित करतात आणि यातच अनावश्यक वस्तूंची खरेदी हाेते. याचे प्रमाण वाढले आहे.   श्रीमंताना वेळ व्यतीत करण्यासाठी पैसे मेाजावे लागतात तर गरीबांना चरितार्थासाठी वेळ कमी पडतो. यावर जावेद अख्तर यांनी लिहिले आहे की, रेल्वेत बसून प्रवास करणाऱ्यास झाडे पळत आहेत असा भास होतो. परंतु मुळात ती जागेवर असतात व रेल्वे धावत असते. असे आपल्या जीवनाबद्दल होऊ नये म्हणजे झाले.   ट्विंकल खन्ना या अन्य सिनेअभिनेत्यांच्या पत्नींपेक्षा वेगळ्या आहेत. आजच्या युगात वाचन व लेखन हे कालबाह्य होत आहे आणि व्यवस्थेने वास्तववादी विचारांना प्रभावहीन बनवले आहे जणू विहीरीत पाणी नसून भांग कालवली आहे. आणि एक विशेष की भांग की पकौड़ी नामक वयस्करांसाठी लिहीलेल्या पुस्तकाचे लेखक आजही कुणास माहित नाहीत.

बातम्या आणखी आहेत...