आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकली सोने देऊन महिलेला पाच लाखांना फसवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - ब्लाऊज शिवून घेण्याचे निमित्त करून आलेल्या राजस्थानी दांपत्याने एका शिलाई काम करणाऱ्या महिलेस अगोदर विश्वासात घेतले. कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून दोन राजस्थानी भामट्यांनी तिच्याकडूूून पाच लाख रुपये व दोन तोळ्यांची बोरमाळ घेऊन पोबारा केल्याची घटना केज शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी घडली. 

मेघराज गमे (रा. नेकनूर)  हे शेती करतात, तर त्यांच्या पत्नी विद्या गमे ह्या शिलाई काम करतात. गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी एक राजस्थानी दांपत्य विद्या यांच्याकडे ब्लाउज शिवून घेण्याच्या निमित्ताने आले. त्यांनी ओळख करून घेत जवळीक साधली. दोन दिवसाने शिवलेले ब्लाउज नेण्यासाठी परत हे राजस्थानी दांपत्य विद्या गमे यांच्याकडे आले. त्यांनी त्यांच्याकडे असलेले चांदीचे नाणे दाखवून आम्हाला रस्त्याचे काम करताना अशा प्रकारचे नाणे व अर्धा किलोहून अधिक सोन्याच्या माळा सापडल्या आहेत. तुम्हाला कमी किमतीत हे दागिने देतो, असे त्यांनी आमिष दाखविले. खात्री करण्यासाठी विद्या यांच्याकडे एक सोन्याचा मणी दिला. खातरजमा करून घेतल्यावर सोने घेण्याची तयारी दाखविली. यासाठी ५ लाखांचा व्यवहार ठरला. दोन दिवसांत त्यांनी व्याजाने काढून पाच लाख रुपये जुळविले.    
  सोमवारी विद्या गमे यांना सोने घेऊन जाण्यासाठी केजला बोलावले. गमे दांपत्य हे दुपारी ४.३० वाजता केजच्या शिवाजी चौकात दाखल झाले. राजस्थानी भामट्यांनी त्यांना उमरी रस्त्याकडून जुन्या दवाखान्याच्या परिसराकडे घेऊन गेले. तेथे त्यांनी एका कापडी छोट्या पिशवीत आणलेल्या सोन्याच्या मण्याच्या माळा काढून दाखवीत गमे दांपत्यांकडून पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर भामटे पसार झाले. फसवणूक केल्याचे कळताच गमे दांपत्याने केज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.