आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातउसने दिलेले पैसे मागितल्याने शिवीगाळ, महिलेची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एका भाजी विक्रेत्या महिलेने सोरेगावच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. अात्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तीन जणांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. नागूबाई सोमलिंग भीमदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या विजापूर रस्त्यावरील सैफुल येथे भाजी विकत होत्या. 


मृत भीमदे यांनी रेणुका रमेश नरुणा (रा. सवेरानगर, सैफुल, विजापूर रस्ता) यांना एक लाख रुपये हातउसने दिले होते. या पैशाची मागणी केली असता, नरुणा यांनी त्यांच्यावर चोरीचा आळ घातला. त्यांच्यासह मंगला हेळकर, त्यांचा मुलगा जगन्नाथ यांनी भीमदे यांना शिवीगाळ केली. भाजी मंडईत पुन्हा दिसलीस तर जीवे मारण्याची धमकी नरुणा यांनी दिली. बुधवारी सायंकाळी भाजी मंडईतच हा प्रकार घडला. त्याने इज्जत गेली, आता जगायची इच्छा राहिली नाही, असे सांगत भीमदे रात्रभर रडल्या. पहाटे प्रतापनगर रस्त्यावरील साेरेगावच्या शेतात गेल्या. तेथील झाडालाच गळफास घेतला. 


याबाबत शिवबाई सोमलिंग भीमदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. नरुणा यांच्यासह मंगला हेळकर आणि जगन्नाथ हेळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...