आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने असे शिंपले मिळाल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेनचा चेहरा दिसत आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिला शिंपले जमवण्याची आवड आहे आणि ती जेव्ह आपल्या नवऱ्यासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत होती. त्यादरम्यानच तिला हे शिंपले मिळाले. त्यानंतर तिने ते एक निशाणी म्हणून आपल्या जवळ ठेवले. महिलेने सांगितल्याप्रमाणे शिंपले मिळाल्यानंतर कितीतरीवेळ ते दोघे केवळ हसत होते.
हे शिंपले ज्या महिलेला मिळाले तिचे नाव डेब्रा ओलिव्हर (60) आहे. जी आपले पती मार्टिन (62) यांच्यासोबत लंडनच्या ब्रेंटफोर्ड भागात राहाते. बुधवारी लग्नाच्या 42 व्या वाढदिवशी ती सेलिब्रेट करण्यासाठी विनचेल्सिया येथील समुद्र किनाऱ्यावर गेली होती. यादरम्यान तिला ते शिंपले मिळाले.
शिंपले पाहून हैराण झाली महिला...
डेब्राचे म्हणणे आहे की, जेव्हा तिची नजर या शिंपल्यावर पडली तिला ते जरा विचित्र वाटले. त्यानंतर जेव्हा तिने ते उचलून पाहिले तेव्हा ती हैरान झाली, कारण त्यामध्ये दहशतवादी ओसामा बिन लादेनचा चेहरा दिसत होता. महिला चेष्टेने म्हणाली, 'मजेदार गोष्ट ही आहे की, त्याला समुद्रातदेखील गाडले गेले होते.'
ओसामाचे असे मिळणे अद्भुत...
महिलेने सांगितल्याप्रमाणे, 'असे नेहमी होत नाही की, तुम्हाला एखादे शिंपले मिळावे. जे कुणासारखे दिसत असेल. अशात ओसामा बिन लादेन अशाप्रकारे मिळणे अद्भुत आहे. कारण आम्ही ज्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलो होतो, तिथे लाखोंच्या संख्येने शिंपले आणि चमकणारे दगड पडलेले आहेत.'
पहिले दिसले येशूंसारखे...
डेब्राने सांगितले, 'शिंपले पाहताच मी ते उचलले. जेव्हा मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. तेव्हा मला वाटले हे येशूसारखे दिसते. मग मला त्याच्यामध्ये वरती दिसली तेव्हा मला कळाले की, माझ्या हातावरून मला कोण एकटक पाहात आहे - ओसामा बिन लादेन.'
अल कायदाचा प्रमुख होता लादेन...
ओसामा बिन लादेन दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रमुख होता आणि अमेरिकेमध्ये 2001 मध्ये 9/11 ला झालेल्या दहशतवादी हल्यांचा मास्टरमाइंडदेखील होता. त्याला 2011 मध्ये अमेरिकन नेव्ही सील कमांडोजने पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये संपवले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.