आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलावर संकट येण्याची भीती दाखवून महिलेला 2 लाखांनी लुबाडले 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- पेन्शनची रक्कम घेऊन बँकेतून बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला दोघांनी आपण हरिद्वारहून आल्याचे सांगत तुमच्या धाकट्या मुलावर आघात होणार आहे, संकट येणार आहे, अशी भीती दाखवून त्यावर उपाय म्हणजे अंगावरील दागिने, पैसे काढून ठेवून दहा पावले चालत मंत्राचा जप करा म्हणत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लुबाडून पोबारा केला. 

 

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुशील पुरुषोत्तम कुलकर्णी (रा. तिरुपती कॉलनी, पिंपरगव्हाण रोड, बीड) बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी शिवाजीनगर येथील एसबीआय शाखेत गेल्या होत्या. बँकेतून २२ हजार रुपये काढून त्या बाहेर आल्या असता एका व्यक्तीने त्यांना आपण हरिद्वारहून आल्याची थाप मारून कुलकर्णी यांना तुमच्या मुलावर आघात होणार असल्याची भीती दाखवली. त्याचवेळी दुसरा एक अनोळखी व्यक्ती तिथे आला. 'मलाही सुनांकडून त्रास होतो' त्यावर उपाय सांगा, अशी विनवणी करू लागला. हरिद्वारहून आल्याचे सांगितलेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सर्व दागदागिने, पैसे रुमालात घालून या मावशींकडे द्या, असे सांगितले. त्या व्यक्तीने आपल्याकडील सर्व पैसे, दागिने एका रुमालात बांधून ते सुशील कुलकर्णींकडे दिले आणि तो दहा पावले जाऊन परत आला आणि कुलकर्णींकडून दागिने परत घेतले.

 

म्हणे, मुलांवर येणार आघात.... 
तो व्यक्ती परत आल्यानंतर हरिद्वारचा असलेल्या व्यक्तीने कुलकर्णी यांनाही तुम्हाला तीन मुले आहेत. त्या पैकी धाकट्या मुलावर आघात होणार असून संकट येणार असल्याचे सांगितले. हे टाळण्यासाठी तुम्हीही कुलदेवीचा जप करत दहा पावले चाला असे सांगितले. त्यांनाही जवळचे दागिने व पैसे एका रुमालात बांधून दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यास सांगितले. त्यांनी बँकेतून काढलेले २२ हजार रुपये, सोबत आणलेले ५७० रुपये या शिवाय, दीड तोळ्याची सोनसाखळी, अडीच तोळ्यांच्या पाटल्या, साडेतीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोबाइल असा एकूण २ लाखांचा ऐवज कुलकर्णी यांनी रुमालात बांधून दिला . त्या कुळदेवतेचा जप करत चालत असताना बदमाश दागिने व पैशांसह पसार झाले. 
 

बातम्या आणखी आहेत...