आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला म्हणाली, ‘ईश्वर कधी पाहिला नाही, पण तो मला आता मोदींमध्ये दिसला...’

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘ईश्वराला कधी पाहिले नाही. परंतु आज तुम्हाला (मोदींना) पाहिले.. तुमच्यात तो दिसला ’, असे सांगणाऱ्या महिलेच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. ती वारंवार हे सांगत होती. तिचे बोल ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदीही भावुक झाले होते. जनऔषधीदिनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील जनआैषधी केंद्राच्या लाभार्थींशी शनिवारी पंतप्रधानांनी चर्चा केली. यादरम्यान डेहराडूनच्या दीपा शहा म्हणाल्या, २०११ पासून मी लकव्याची रुग्ण आहे. पुन्हा बरी होऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगून टाकले होते. परंतु आपला आवाज एेकून मी बरी होऊ लागले. आधी आैषधी खरेदीसाठी ५ हजार रुपये खर्च येत होता. परंतु जनआैषधी केंद्रातून आैषधी खरेदी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून खरेदीचा खर्च घटला. केवळ दीड हजार रुपयांत आैषधी खरेदी करता येते, असे त्यांनी सांगितले. त्यावर मोदी म्हणाले, उभे राहण्यास तुम्हाला त्रास होत आहे. तुम्ही खाली बसून बोलावे. खरे तर तुम्ही धैर्य दाखवले. त्यामुळेच तुम्ही आजारावर मात करू शकलात. अशाच निर्धाराने राहावे. हा दिवस उत्सव साजरा करण्याचा नव्हे तर अशा लाखो भारतीयांशी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा आहे. या योजनेमुळे १ कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. स्वस्त आैषधींच्या माध्यमातून देशातील लोकांची २५०० काेटी रुपयांची बचत झाली आहेे. जनआैषधी केंद्रे ७०० जिल्ह्यांत सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...