आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Woman's Burnt Body Was Found Near The Temple, The Second Incident In Telangana In 48 Hours

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिराजवळ आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, राज्यात 48 तासातील दुसरी घटना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटना शुक्रवारी शम्शाबादजवळील सिद्दुला गुट्टा मंदिर परिसरात घडली

शम्शाबाद(तेलंगाना)- येथील सिद्दुला गुट्टा मंदिर परिसरात शुक्रवारी महिलेचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा परिसर आरजीआय एयरपोर्ट पोलिस स्टेशन अंतर्गत येतो. शम्शाबाद झोनचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, मंदीरपरिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना स्थानिक नागरिकांडून मिळाली. दरम्यान, लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न अपयशी ठरले.पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात 30 ते 35 वयातील महिला असल्याचे समोर आले आहे. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत. दरम्यान, महिलेने स्वतः आग लावून घेतली का, दुसऱ्याने आग लावली याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीये.

48 तासातील दुसरी घटना
 
रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगर परिसरात बुधवारी एका वेटरनरी डॉक्टरचा जळालेला मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात बलात्कार करून खून केल्याचे उघड झाले. शुक्रवारी हे प्रकरण प्रकाश झोतात आले. सध्या देशपातळीवर घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रीया येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...