Home | Khabrein Jara Hat Ke | The women of this village perform dance performances during the funeral

या गावातील महिला अंत्यसंस्कारावेळी करतात डान्स, कारण जाणून व्हाल हैराण

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2019, 01:04 PM IST

चीन सरकारने केली याबाबत कारवाई, पण अद्यापही सुरू आहे ही विचित्र प्रथा

  • The women of this village perform dance performances during the funeral

    खबरे जरा हट के - निर्सगाच्या नियमच आहे, एक ना एक दिवस आपल्यांना सोडून जावे लागले. अशावेळी आपल्यावर प्रेम करणारे दु:खी होतात. पण चीनमध्ये एका व्यक्ती मेल्यानंतर अश्लील डान्स केला जातो. चकीत व्हायचे कारण नाही कारण चीनच्या ग्रामीण भागात असेच घडते. आज आम्ही तुम्हाला या विचित्र प्रथेबद्दल सांगत आहोत.


    चीनच्या काही ग्रामीण भागात एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारावेळी मुली अश्लील डान्स करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पण या परंपरेने आता आधुनिक रूप घेतले आहे. येथील महिला आपल्या पतीच्या मृत्युनंतर स्ट्रिप डान्सर्सला बोलावतात. हे डान्सर्स डान्ससोबत रडण्याचे नाटकही करतात. मिळालेल्या माहितीनुसार या परंपरामागे येथील महिलांनी विचित्र कारण सांगितले आहे. महिलांच्या मते, पतिला शेवटची आणि शानदार भेट देण्यासाठी असे डान्स करतात.

    चीन सरकारने केली होती कारवाई
    ही डान्सची परंपरा त्यांच्यासाठी महत्वपूर्ण मानली जाते. या महिला शवपेटीच्या आसपास नृत्य करतात. सोबतच येथील लोकांचे मानने आहे की, अंत्ययात्रेत डान्सर्सला बोलविल्यानंतर लोकांची गर्दी वाढलेत आणि अंत्ययात्रते जितके जास्त लोक असतील तितकाच मरणाऱ्याच्या आत्म्याला शांती मिळते. तर चीनच्या सरकारने या परंपरेवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. 2006 आणि 2016 मध्ये चीन सरकारने या प्रथेबाबत कारवाई केली होती. पण यानंतरही ग्रामीण भागात ही प्रथा अद्यापही कायम आहे.

Trending