आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हिंदू' हा शब्द कोणत्याही प्राचीन धर्म ग्रंथात आढळत नाही, हा शब्द इंग्रजांकडून मिळालेली उपाधी आहे- कमल हसन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- "हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नाही. हा शब्द मुघल किंवा इंग्रजांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे 'हिंदू' हा शब्द वापरण्याऐवजी आपण स्वत:ला 'भारतीय' म्हटले पाहिजे", असे वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी केले आहे.


काही दिवसांपूर्वी "स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे होते. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली." असे वादग्रस्त वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. त्यावेळी मोठा वाद पेटला होता, पण आता या नव्या वक्तव्यामुळे वादाला पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या वक्तव्यासोबतच "अलवर ते नयनमार आणि शैव ते वैष्णवांनीही कधीच 'हिंदू' शब्दाचा वापर केला नाही. तसेच या शब्दाचा कोणत्याही प्राचीन धर्म ग्रंथात उल्लेखही आढळत नाही. त्यामुळे हा शब्द ब्रिटिशांच्या राजवटीत प्रचलित झाला आहे आणि आजतागायत आपण हा शब्द पुढे नेण्याचे काम करत आहोत," असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


याआधीही अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या कमल हसन यांनी तामिळनाडूतील अरावकुरीचीमधल्या प्रचारसभेत बोलताना "स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे होते. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली", असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

बातम्या आणखी आहेत...