आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Word Tolerance Is Not From India, We Are Not Just Tolerant, We Accept Others And Hug It: Prasoon Joshi

सहिष्णुता हा शब्द भारताचा नाहीच, आम्ही नुसते सहिष्णु नव्हे, इतरांना स्वीकारून आलिंगन देतो : प्रसून जोशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर : जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी प्रसून जोशी यांनी मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले, मला सहिष्णुता या शब्दाबद्दलच तक्रार आहे. याचा अर्थ आहे, सर्वांचा स्वीकार. हा आमच्या देशाचा शब्द नाही. आमच्यात मुळातच ही वृत्ती आहे. आपण नुसते सहन करत नाही, प्रत्येकालाच स्वीकारतो, आलिंगन देतो. आपल्या देशाची भाषाच या प्रकारची आहे. येथे टॉलरन्स अर्थात सहिष्णुता किंवा सहनशीलता या शब्दाचा वापर करू नका.

वाणी त्रिपाठी यांच्याशी चर्चेदरम्यान जोशी यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले, विविधतेचा अर्थच चुकीचा लावला जातो. ढोलसोबत कुणी बासरी वाजवली तर बासरीचे सूर ऐकूच येणार नाहीत, हे लक्षात ठेवावे लागेल. डायव्हर्सिटीचा अर्थ आहे तरी काय? तुम्हाला तुमच्यासारखेच ठेवून तुमचा स्वीकार करू, हा त्यातील खरा अर्थ आहे. आपल्या सोयीनुसार दुसऱ्याचा वापर करणे ही विविधता नाही.

  • दोन अभिनेत्रींनीही मांडले विचार

अभिनेत्री नंदिता दास- सीएए-एनआरसीत धाेकादायक नाते

अभिनेत्री नंदिता दास यांनी सीएए-एनआरसीबद्दल सांगितले की, या दोन्ही कायद्यांत एक धोकादायक नाते आहे. या कायद्यान्वये आपल्याला भारतीय असल्याचे पुरावे मागितले जात आहेत. आपले मतभेद असले तरी यावरील असहमतीसाठी दोघेही सहमत असायला हवेत.'

सोनाली बेंद्रे- कर्करोग झाल्यानंतर गॉसिप नको होते

सोनाली म्हणाली, मला कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा मी अस्वस्थ होते. याबाबत मी सोशल मीडियावर यासाठी शेअर केले की मला या विषयावर कोणत्याच प्रकारचे गॉसिप नको होते. आपल्या जवळच्या माणसाशीही काही न बोलणारी अनेक माणसे आहेत. मी याबद्दलही चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...