आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात संविधान जनजागृतीचे काम २०२० पर्यंत अविरत सुरू राहील : दिनेश वाघमारे

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गाेजीत प्रधान सचिव दिनेश वाघमारेंचा नागरी सत्कार, ‘संविधान साक्षर ग्राम’चा समाराेप

औरंगाबाद / वर्धा- राज्यात गाव, वस्ती अन् तांड्यावर राहणाऱ्या अशिक्षित, सुशिक्षित शेतमजूर, शेतकऱ्यांना भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले मुलभूत अधिकार, कर्तव्य अन् स्वातंत्र्य कळावे, यासाठी राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात २६ नाेव्हेंबर २०१९ ते २६ नाेव्हेंबर २०२० या एक वर्षात संविधान जनजागृतीचे काम राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने हाती घेतले आहे. हे जनजागृतीचे काम बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावात वर्षभर केले जाणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केले.
वर्धा तालुक्यातील गोजी गावात “संविधान साक्षर ग्राम’अभियानाच्या समारोप व प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या नागरी सत्कार प्रसंगी ते रविवारी (२२ डिसेंबर) बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोजीच्या सरपंच शुभांगी गणोरे होत्या. तर, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला देशमुख, वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन अाेंबासे, प्रमुख वक्त्या अॅड. सुषमाताई अंधारे,  प्रादेशिक अायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक अायुक्त कुलकर्णी, बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिक प्रज्ञा वाघमारे, अॅड. स्मिता कांबळे, ताराचंद वाघमारे, अायाेजक प्रकल्प अधिकारी दिनेश बारई उपस्थित हाेते. या वेळी गोजीचे भूमिपुत्र तथा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश ताराचंद वाघमारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी गोजी ग्रामपंचायतीत बसवलेल्या उद्देशिकेच्या कोनशीलाचे पूजन करण्यात आले. तर अॅड. स्मिता कांबळे यांनी उद्देशिकेचे वाचन केले. तर खंजिरी वादक  तुषार सूर्यवंशी यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम झाला. प्रधान सचिव वाघमारे म्हणाले की, बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून “संविधान साक्षर ग्राम’ अभियान राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातून ७२ गावांची निवड केली हाेती. या गावात २६ नाेव्हेंबरपासून हे अभियान राबवण्यात येत आहे. याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. यातून ग्रामस्थांना संविधान साक्षर करण्याचा प्रयत्न केला जात अाहे. प्रत्येक नागरिक संविधान साक्षर झाल्यास गावागावात विविध जाती, धर्माचे लोक समता, बंधुत्वासह गुण्यागोविंदाने एकत्र राहून आपल्या देशाची अखंडता अबाधित ठेवतील. त्यामुळे प्रत्येकाने भारतीय संविधानातील मूलभूत तत्त्वांचा अंगिकार करून त्याप्रमाणे अाचारण करावे, असेही ते म्हणाले.  तर, प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या की, राज्यातील ७२ गावांत संविधान साक्षर ग्राम अभियान राबवण्यात येत आहे. संविधान साक्षरतेबराेबर गावात स्वच्छता माेहीम राबवत राज्य शासनाच्या विविध याेजनांचा प्रचार व प्रसार केला जात अाहे. राज्यात ३९० समतादूत गावागावात जनजागृतीचे व प्रबाेधनाचे काम करत अाहेत. डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे म्हणणं हाेतं की, प्रबुद्ध भारत झाला पाहिजे, परंतु यात विविध जाती, धर्माचे लोक वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे सर्व लोकांनी धर्मासाठी नाही तर संविधानाच्या एका छताखाली यावे, यासाठी संविधान साक्षर ग्राम अभियान राज्यभरात राबवण्यात येत आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी अॅड. सुषमाताई अंधारे यांनी ‘भारतीय संविधान’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.  प्रास्तविक प्रादेशिक अायुक्त सिद्धार्थ गायकवाड व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फुलझेले यांनी केले.
समाजप्रबोधन अन् पथनाट्यासह स्वाधार योजनेचेे बार्टीच्या समतादूतांचे उत्तम काम
राज्यात मागील काही वर्षांपासून बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून आरटीई सर्वेक्षण, रेशीम शेतीविषयक शेतकऱ्यांचे समुपदेशन, समाज कल्याण विभागाची स्वाधार योजना, कलाकार सर्वेक्षण यासह अन्य विविध उपक्रमांसह थोर महापुरुषांचे विचार गावागावात पोहोचून समाज प्रबोधन अन् पथनाट्यातून जनजागृतीचे काम करताहेत. समतादूतांनी पुढाकार घेऊन जनजागृती व अर्ज स्वत: भरुन घेतल्यामुळे सर्वांधिक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. समतादूत म्हणून काम करणारे सर्वच उच्च शिक्षित व काही पीएचडी केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा समाजाला फायदा होतो. एकदंरीत समतादूतचे सर्वच आतापर्यंतचे काम पाहता खरोखर गौरवास्पद आहे, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.  

माझ्या वडिलांचे समाज हिताचे काम अतुलनीय

गाेजी हे माझ्या वडिलांचे गाव. वडील सैन्यात असल्याने वडिलांची बदली हाेत हाेती. त्यामुळे गाव साेडून राहावे लागले. परंतु, वडिलांसाेबत अनेक वेळा गावात येत हाेताे. हळूहळू या गावात येणे जाणे कमी झाले. परंतु, वडिलांना समता अन् बंधुत्वांवर काम करायची खूप अावड हाेती. त्यांनी धम्म साधना, पुणे येथे गाैतम बुद्ध संघ स्थापन केला. त्यांची शिक्षण संस्थाही अाहे. माझे वडील गावातील अनुसूचित जातींच्या लाेकांचा विकास कसा हाेईल, यावर आवर्जून लक्ष देत. त्यांनी स्वत:ला यात झाेकून देत गावात स्वच्छता अभियान, दारूबंदी, पर्यावरणावर काम केले. ते एक उत्तम कवीही हाेते, असेही सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव  दिनेश वाघमारे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.