आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने बुद्ध दिला पण जगाला छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांची गरज; मोदींच्या त्या वक्तव्यावर संभाजी भिंडेंचा आक्षेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिल्याचे अमेरिकेतल्या ह्युस्टनच्या भाषणात म्हटले होते. मोदींच्या याच विधानावर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिंडेंनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान अमेरिकेतल्या भाषणात म्हटले होते की, भारताने जगाला बुद्ध दिला, पण उपयोग होईल असा नाही. विश्वाचा संचार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत. नरेंद्र मोदी चुकीचे बोलले असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता जोडी आज सुरुवात झाली. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. 
 
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला. भारताने जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश दिला असल्याचे मोदी म्हणाले होते. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांच्या विचारांचा देखील उल्लेख केला. मात्र संभाजी भिडे यांनी मोदींच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत. बुद्ध उपयोगाचा नाही असे भिडे म्हणाले. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत.