आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वोत्कृष्ठ फील्डर जॉन्टी रोड्सने गंगेमध्ये केले स्नान, म्हणाला - याचे शारीरिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिकेश : जगातील सर्वश्रेष्ठ फील्डर मानला जाणारा साऊथ अफ्रीकेचा जॉन्टी रोड्स बुधवारी ऋषिकेशला त्याने गंगेमध्ये स्नान केले. त्याने आपला फोटो ट्विटरवर पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पवित्र गंगेच्या ठंडगार पाण्यामध्ये स्नान केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही फायदे आहेत.’ तसेच भारतीय यूजर्सनेही लिहिले - भारतात तुमचे स्वागत आहे. मात्र भारतीय स्पिनर हरभजन सिंहने लिहिले, ‘माझ्या मित्रा, तू माझ्यापेक्षा जास्त भारत पाहिला आहे. तुला गंगेमध्ये स्नान करताना पाहून खूप छान वाटते. पुढच्यावेळी मलाही सोबत घेऊन चल.’ रोड्स आपल्या कुटुंबासोबत भारतात सुट्ट्या एन्जॉय करत आहे. 

जॉन्टीने आपल्या फोटोसोबत तीन हॅशटॅग शब्दांचा वापरही केला आहे. त्याने मोक्ष, ऋषिकेश आणि इंटरनॅशनल योग फेस्टिव्हल हे शब्द टॅग केले आहेत. जॉन्टीने भारतीय स्टाइलमध्ये गंगेत छातीपर्यंत खोल पाण्यात उभे राहून दोन्ही हात जोडले. 50 वर्षांचा जॉन्टी रोड्स सध्या आयपीएलच्या 13 व्या पर्वासाठी भारतात आला आहे. यावेळी तो किंग्स इलेव्हन पंजाबसोबत फील्डिंग कोच म्हणून जोडला गेला आहे. जॉन्टीच्या कार्यकाळात मुंबईने तीनवेळा खिताब आपल्या नावे केला आहे. 

साऊथ अफ्रीकेसाठी 52 टेस्ट आणि 245 वनडे खेळलेल्या जॉन्टी रोड्सला भारत खूप आवडतो. त्याने 2016 मध्ये जन्मलेल्या आपल्या मुलीचे नावदेखील 'इंडिया' ठेवले आहे. तो भारताची संस्कृती, परंपरा आणि वारशाने खूप प्रभावित झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...