आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिली ३डी प्रिंटेड हायपर कार ‘ब्लेड’ सादर, ६३५ किलाे वजन, चेसिस सर्वसाधारण कारपेक्षा ९०% हलकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाॅस एंजलिस - अमेरिकेतील स्टार्टअप कंपनी डिव्हरजंट थ्रीडीने थ्रीडी - प्रिंटेड तंत्रज्ञानापासून तयार जगातील पहिली हायपर कार ‘ब्लेड’ सादर केली आहे. याच्या बाॅडीला एअराेस्पेस ग्रेड कार्बन फायबर व अॅल्युमिनियम अलाॅयपासून तयार केले आहे. या कारला १०० किमी वेग पकडण्यासाठी फक्त २ सेकंद लागतात. या कारला ७३० अश्वशक्तीची ताकद आहे. कंपनीने एक सीटर ब्लेड तयार करण्याबराेबरच थ्रीडी प्रिंटेडची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिला रस्त्यावर धावण्यासाठी कायदेशीर अडचणींना ताेंड द्यावे लागणार नाही. याला फाेर व्हील ड्राइव्ह देण्यात आले आहे. थ्रीडी प्रिंटेड तंत्रज्ञानापासून तयार झालेल्या कारच्या चेसिसचे वजन फक्त ४६ किलाे आहे. पारंपरिक कारच्या तुलनेत ते ९०% पर्यंत कमी आहे. 

 

याची केबिन जेट प्लेनप्रमाणे तयार केली आहे

या कारची डिझाइन विमानाप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. याचे केबिन जेट विमानाप्रमाणेच करण्यात आले आहे. ब्लेडचे प्राेटाेटाइप डिटेल्स २०१५ मध्ये जगासमाेर आले हाेते.