• Home
  • The world's first aircraft powered by electricity took off; It is made by converting the sea plane

कॅनडा / विजेवर चालणाऱ्या जगातील पहिल्या एअरक्राफ्टने उड्डाण घेतली; सी-प्लेनला कंवर्ट करुन बनवले विमान

  • 6 सिट असलेल्या विमानाने 15 मिनीटे गगनभरारी केली, यात 750 एचपीची इलेक्ट्रिक मोटर

दिव्य मराठी वेब टीम

Dec 13,2019 11:58:00 AM IST

वँकूवर- कॅनडामधील वँकूवरमध्ये मंगळवार पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या कमर्शिअल एअरक्राफ्टचे परीक्षण करण्यात आले. या दरम्यान विमानाने 15 मिनीटे गगनभरारी घेतली. सिएटलच्या मॅग्निक्स कंपनीने सांगितल्यानुसार, हे 62 वर्षे जुने सी प्लेन आहे. यात 750 एचपीची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आले. विमानात 6 प्रवासी बसू शकतात.

ऑस्ट्रेलियातील इंजिनियरींग फर्म मॅग्नीएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोई गेंजार्स्कीने सांगितले की, हे तंत्रज्ञान स्वस्त हवाई प्रवास उपलब्ध करुन देईल आणि यातून कार्बन उत्सर्जनदेखील होणार नाही. याला आपण ई-विमानाचा युग म्हणू शकतो. कार्बन उत्सर्जनचे एक मोठे कारण नागर विमान सेवा आहे. ई विमानांमुले प्रदुषणावर आळा बसेल पण यात थोडा वेळ लागेल.

X
COMMENT