आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The World's First Floating Dairy Farm, The Robot Collects 800 Liters Of Milk From 35 Cows Every Day

जगातील पहिले तरंगते डेअरी फार्म, 35 गायींचे प्रतिदिन 800 लीटर दूध काढतात रोबोट, सोलार पॅनलद्वारे फार्म आपली वीज स्वतः बनवते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरडम : नेदलँडच्या रोटरडममध्ये जगातील सर्वात पहिला तरंगता दोन मजली डेअरी फार्म सुरु झाले आहे. बंदरावर बनलेल्या फार्ममध्ये 40 गायी पाळल्या जाऊ शकतात. पण आता येथे 35 गायी ठेवल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे 800 लीटर दुधाचे उत्पादन दररोज मिळते. दूध काढण्यासाठी रोबोट्स ठेवले गेले आहेत. फार्मला डच प्रॉपर्टी कंपनी बेलाडोनने तयार केले आहे. फार्म शहरात दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी बनवले गेले आहे. 

 

बंदरावर फार्म, सहज सप्लाय होतात प्रोडक्ट... 
फार्म बंदरावर असल्यामुळे प्रोडक्ट उपभोक्तापर्यंत सहज पोहोचवले जातात. इकडे संयुक्त राष्ट्राचे फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशन (एफएओ) प्रमुख डॉ. फेंटन बीडने सांगितले की, शहरी फार्म उत्तम असतात, कारण त्यामध्ये कमी पाणी, फर्टिलायजर आणि पेस्टीसाइडचा वापर होतो. 

 

फूड फॅक्टरिंचे वेस्ट गायींना दिले जाते...  
फार्मचे जनरल मॅनेजर अल्बर्ट बेरसनने सांगितले, गायीचे 80% भोजन रोटरडमच्या फूड फॅक्टरींमधून येणारे वेस्ट प्रोडक्ट आहे. बेवरीज, रेस्तरॉ आणि कॅफेचीदेखील मदत घेतली जात आहे. सोलार पॅनलद्वारे फार्म आपली वीज स्वतःच बनवते. फार्ममध्ये निघणाऱ्या शेणाचा वापर खत आणि गॅस बनवण्यासाठी केला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...