आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिली तरंगती डेअरी, दररोज रोबोटकडून काढले जाते ३५ गाईंपासून मिळणारे ८०० लिटर दूध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरडॅम - नेदरलँडच्या रोटरडॅममध्ये जगातील पहिली दोन मजली डेअरी सुरू झाली आहे. बंदरावर तयार झालेल्या या डेअरीत ४० गाई आहेत. परंतु येथे आता ३५ गाई आहेत. त्यांच्यापासूून दररोज सुमारे ८०० लिटर दूध मिळते. दूध काढण्यासाठी रोबोट्स अाणले आहेत. ही डेअरी डच प्राॅपर्टी कंपनी बेलाडोनने तयार केली आहे. ही डेअरी  शहरात दूध पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आली. डेअरी बंदरावर असल्याने दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोपे जाते. संयुक्त राष्ट्रातील फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन (एफएओ)चे प्रमुख डॉ. फँटन बीड यांनी शहरातील डेअरीत पाण्याचे प्रमाण कमी असते व पेस्टिसाइडचा वापर केला जातो, असे सांगितले. 

 

अन्न प्रक्रिया उद्योगातून निघालेले टाकाऊ पदार्थ गाईंना देतात

डेअरीचे सरव्यवस्थापक अल्बर्ट बॅरसन यांनी सांगितले, गाईंना ८०% खाद्य रोटरडमच्या अन्न प्रक्रिया उद्याेगातून निघणाऱ्या टाकाऊ पदार्थाचे दिले जाते. दारुचे कारखाने, रेस्तरां व कॅफेचीही मदत घेतली जात आहे. सोलर पॅनेलद्वारे डेअरीत स्वतंत्र विज निर्मिती होते. डेअरीतून निघणाऱ्या शेणाचे खत व गॅस तयार होते. 

बातम्या आणखी आहेत...