आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड - बीड तालुक्यातील पालवण येथील सह्याद्री देवराई प्रकल्पावर १३ व १४ फेब्रुवारीला जगातील पहिले वृक्ष संमेलन हाेत आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान या वडाला मिळाले. या वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ना काेणती स्पर्धा झाली ना निवडणूक ना मानापमान नाट्य! हा वटवृक्षच बिनविरोध अध्यक्ष ठरला.
१३ फेब्रुवारी रोजी शंभर मुली १०० वृक्ष रोपांना वंदन करून संमेलनाचे उद्घाटन करतील. या रोपांचे संमेलन स्थळी रोपण केले जाईल. बुधवारी (१२ फेब्रुवारी) वृक्ष दिंडी काढली जाणार आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई प्रकल्प उभारण्यात आला आहे. सह्याद्री देवराईत लाखो देशी झाडांची लागवड झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता बीडच्या डॉ. आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी एका पालखीतून झाडांच्या रोपांची दिंडी निघेल.
तीन मुली ठरणार वृक्षसंुदरी
भारतात झाडांच्या प्रमाणासह मुलींचा जन्मदरही कमी होत आहे . झाड जगले नाहीत लोक जगणार नाहीत. मुलींचे प्रमाण वाढले नाही तर पिढी निर्माण होणार नाही याच उद्देशाने वृक्ष संवर्धनासाठी मुलींचा सहभाग वाढला पाहिजे म्हणून या संमेलनात वृक्षसंुदरी स्पर्धा होत आहे. सहभागी शंभर मुलींसाठी पर्यावरणावर आधारीत प्रश्नोत्तरांची अंताक्षरी असणार आहे. यातून १० मुलींची निवड होऊन १० पैकी तीन मुलींची वृक्षसुंदरी म्हणून निवड केली जाईल.
मान्यवरांची वृक्ष, वनस्पतीवर व्याख्याने
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.