आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात दिवसांत साकारले जगातील पहिले अंडरवाॅटर मिलिटरी म्युझियम; तेथे रणगाडे, हेलिकॉप्टरसह १९ प्रकारची उपकरणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अम्मान - जगातील पहिले पाण्याखालील लष्करी उपकरणांचे संग्रहालय (अंडरवाॅटर मिलिटरी म्युझियम) जॉर्डनमध्ये साकारण्यात आले आहे. जॉर्डनच्या दक्षिणेकडील  लाल समुद्रात ८ फूट खाेलवर बनलेल्या या संग्रहालयात सैन्य दलाने युद्ध रणगाडे, सैनिक रुग्णवाहिका,  हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, क्रेनसह अॅंटिएअरक्राफ्टसह १९ प्रकारची विविध सैन्य उपकरण ठेवली आहेत. विशेष म्हणजे, हे खास म्युझियम केवळ सात दिवसांत तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी वेळाेवेळी प्रदर्शन भरवले जाईल व नागरिकांना समुद्री जिवांसह काही तरी वेगळे पाहायला मिळेल, असे अकाबा स्पेशल इकाॅनॉमिक झोन अॅथॉरिटीने (एएसईजेडए) सांगितले. 

 

तेथे जाण्यासाठी बाेटीची व्यवस्था
या संग्रहालयापर्यंत जाण्यासाठी बाेटीची व्यवस्था आहे; परंतु त्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा ड्रेस घालावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...