आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The World's Largest Book, It Has Been Prepared By A 71 Year Old Man With His Hands Small Village In Northern Hungary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात मोठे पुस्तक, वजन 1420 किलो; याचे एक पान पलटन्यासाठी लागतात सहा लोक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर हंगरीच्या सिनपेत्री गावातील बेला वर्गाने पुस्तक तयार केले, लांबी 4.18 मीटर तर रुंदी आहे 3.77 मीटर
  • पुस्तकात परिसरातील वातावरण, गुफा आणि भूभागांची माहिती आहे

सिनपेत्री- उत्तर हंगरीतील गाव सिनपेत्रीचा रहिवासी असलेल्या बेला वर्गाने आपल्या हाताने एक पुस्तक बनवले आहे. त्यांनी दावा केला आहे की, हे जगातील सर्वात मोठे पुस्तक आहे. 71 वर्षीय बेला यांनी पुस्तक बनवण्यासाठी पारंपरिक बुक बाइंडिंग पद्धतीचा वापर केला आहे. 4.18 मीटर लांब आणि 3.77 मीटर रुंद पुस्तकात 346 पेज आहेत. या पुस्तकाचे वजन 1420 किलोग्राम आहे. पुस्तकात परिसरातील वातावरण, गुफा आणि भूभागांची माहिती आहे

बेला यांनी सांगितले की, हे पुस्तक फक्त याच्या आकारामुळेच नाही तर याला बनवण्याच्या पद्धतीनेही चर्चेत आली आहे. हे पुस्तक परिसराची माहिती देणाऱ्या पुस्तकांपेक्षा वेगली आहे. यासाठी लाकडाचा टेबल आणि अर्जेटीनावरुन मागवलेल्या गाईच्या चामड्याचा वापर झाला आहे. या पुस्तकाचे पेज पलटण्यासाठी 6 लोक लागतात. एक मशीन आणि स्कूजच्या मदतीने हे पान पलटले जाते.

पुस्तकाचे नाव गिनीज बुकमध्ये दाखल करणार

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव दाखल करण्यासाठी पुस्तकाची एक लहानशी कॉपीदेखील तयार करण्यात आली आहे. याचे वजन 11 किलोग्राम आहे. दोन्ही पुस्तकांना सोबतच तयार केले आहे.