आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The World's Largest Lottery Draw, Distributed Rs 1728 Crore; The Tradition Is Of 200 Years Old

जगातील सर्वात मोठा लॉटरी ड्राॅ, 1728 कोटी रुपये वाटले; 200 वर्षांपूर्वीची ही परंपरा सरकार पार पडते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेड्रिड : स्पेनमध्ये रविवारी जगातील सर्वात मोठी ख्रिसमस लाॅटरी एल गोर्डोच्या पुरस्कारांची घोषणा केली गेली. ख्रिसमच्या निमित्त दरवर्षी 22 डिसेंबरला होणाऱ्या या इव्हेंटमध्ये देशभरातून खूप उत्साह दिसतो. ज्या ओपेरा हाउसमध्ये हा ड्राॅ झाला त्यामध्ये आणि बाहेर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. देशाच्या टेलीव्हिजनवरदेखील याचे थेट प्रक्षेपण केले गेले. 


लाॅटरीडावर एकूण 1728 कोटी रुपये (2.43 बिलियन डाॅलर) चे पुरस्कार दिले गेले. हा ड्रॉ देशातील सरकार चालवते. पहिला पुरस्कार तिकीट नंबर 26590 ला दिला गेला. त्याला तीन 3 कोटी (436000 डाॅलर) रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले. या पुरस्कारांव्यतिरिक्तही अनेक छाेटे-छाेटे पुरस्कार आहेत. लॉटरीचा जॅकपॉट ख्रिस्मसच्यावेळी काढला जाती. यामध्ये 00000 ते 84999 पर्यंत लॉटरी नंबर उपलब्ध असतात. यामध्ये तीन मुख्य शीर्ष पुरस्कार आणि 1000 पेक्षा जास्त लहान पुरस्कार असतात. 

बॉलवर लॉटरीचा नंबर लिहिलेला असतो... 


लाॅटरीचा ड्राॅ वेगळ्या पद्धतीचा असतो. यामध्ये कोणतीही मशीन किंवा टेक्निक सामील नसते. मेटलच्या मोठ्या गोळ्यामध्ये छोटे छोटे लाकडाचे बॉल भरलेले असतात. प्रत्येक बॉलवर 5 अंकी संख्या लिहिलेली असते. ड्रॉची घाेषणा शाळेतील मुले करतात. गोळ्यामधून एक एक करून बॉल काढले जातात आणि बक्षिसांची घोषणा केली जाते. स्पेनची ख्रिसमस लॉटरी 1812 मध्ये सुरु झाली होती. ही जगातील सर्वात जास्तवेळ चालणारी लॉटरी बनली आहे. तिकिटे कुटुंब, मित्र किंवा सह कर्मचारी मिळूनही खरेदी करू शकतात. बक्षीस लागल्यावर ते पैसे तुम्ही वाटूनही घेऊ शेतात. एका तिकीटाची किंमत 200 यूराे (सुमारे 15761 रुपये) असते. 

बातम्या आणखी आहेत...