आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉस एंजलिसमध्ये जगातील सर्वात महागडे स्पोर्ट‌्स कॉम्प्लेक्स, अंदाजे 36 कोटींचा खर्च; व्हॅटिकन सिटीपेक्षा दुपटीने आहे मोठे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंगलवूड- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील इंगलवूड शहरामध्ये आता नॅशनल फुटबॉल लीगचे (एनएफएल) जगातील सर्वात महागडे  स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार होत आहे. याचे  ‘लॉस एंजलिस स्टेडियम अँड एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स’ असे नामकरण करण्यात आले. याचा अंदाजे खर्च ३६ कोटी  आहे.  त्यामुळे  हे जगातील सर्वात महागडे कॉम्प्लेक्स मानले जाते. कारण, जगात यापेक्षा अधिक खर्चामध्ये आतापर्यंत एकही स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलेले नाही. गत दोन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली.  त्यामुळे आता पुढच्या वर्षापर्यंत म्हणजेच २०२० पर्यंत हे स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स तयार होण्याचे चित्र आहे. याची आता सध्या क्रीडा विश्वात मोठी चर्चा रंगत आहे.

 

हेच कॉम्प्लेक्स शहराचे मीडिया सेंटरही असेल   
एलए कॉम्प्लेक्सच्या उभारणीला सुरुवात झाली. याचदरम्यान या सर्वात महागड्या कॉम्प्लेक्सच्या वापरासाठीही मोठी चर्चा झाली. यातून याचा कशासाठी वापर केल्या जाईल, यावर बैठकीत मोठी चर्चा रंगली.  त्यानंतर या ठिकाणी शहराचे मीडिया सेंटरही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यावर सर्वांनी एकमताने निर्णय घेतला. त्यामुळे या कॉम्प्लेक्सच्या परिसरामध्ये आता मोठ्या संख्येत स्थानिक मीडिया हाऊस हे आपापली कार्यालये तयार करत आहेत.  याशिवाय याच ठिकाणी सिनेमागृह आणि इतर अॅक्टिव्हिटीज सेंटरच्या उभारणीचाही निर्ण घेण्यात आला. कारण, येथील आसनक्षमता ही सर्वाधिक दीड लाखाची आहे. त्यामुळे हे सर्वासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...