आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप बॅलन्सशीट : आतापर्यंतचा सर्वात महागडा वर्ल्डकप, १३९० काेटींचा खर्च; पहिल्यांदा सिनेप्लेक्स आणि क्रुजवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक स्तरावर आता क्रिकेटची लाेकप्रियता झपाट्याने वाढत आहे. याला सर्वाधिक लाेकप्रियता ही भारतीय उपखंडामध्ये माेठ्या प्रमाणात मिळाली आहे. यामध्ये भारतासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशाचा समावेश आहे. या ठिकाणी िक्रकेटला माेठी लाेकप्रियता मिळाली आहे. तसेच चाहत्यांची या ठिकाणीची संख्याही विक्रमी आहे. त्यामुळेच आयाेजकांना या स्पर्धेच्या माध्यमातून काेट्यावधी रुपयांच्या महसुलाची कमाई करता येत आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या सामन्यांचाही महसुलाच्या कमाईमध्ये माेठा वाटा आहे. त्यामुळेच आयसीसी देखील भारत आणि पाक या सामन्यानुसार विश्वचषकातील वेळापत्रकाचे नियाेजन करते. म्हणजे हा सामना रविवारी आणि विकेंडलाच आयाेजित करण्याचा आयसीसीचा प्रयत्न असताे. कारण, या सामन्याच्या माध्यमातून आयसीसीला  माेठी कमाई करता येते. या सामन्यात सर्वाधिक जाहीराती असतात. यातूनच आयसीसीला १३९० काेटींचा खर्च करावा लागत आल्याची आतापर्यंतची नाेंद आहे. 

 

व्ह्युअरशिप : भारत-पाक लढत रविवारीच, चाहत्यांची संख्या वाढवण्यासाठी निर्णय

> यंदा भारत आणि पाकिस्तानचा सामना रविवार हाेणार आहे. यातून सर्वाधिक चाहते याच्याशी जुळले जातील, असाच आयसीसीचा उद्देश आहे. भारताचे सर्व सामने दुुपारी ३ वाजता सुरु हाेतील. 

 
> गत वर्ल्डकपमध्ये (२०१५) भारत-पाक सामना टीव्हीवर २८.८ चाहत्यांनी पाहिला हाेता. हा विश्वचषकात सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला हाेता.  


> या सामन्यादरम्यान १०० ते ११० काेटींच्या महसुल जमा हाेताे. १० सेकंदाच्या अॅडचे दर २५ लाख व एचडीला १८ लाख आहेत.


 

तिकीट :  इंग्लंड संघाच्या सामन्याचे तिकीट दर भारताच्या सामन्यांपेक्षा अर्धे

> भारतमध्ये क्रिकेट सर्वाधिक लाेकप्रिय आहे. इंग्लंडमध्येही भारताचे माेठ्या संख्येत चाहते आहेत. त्यामुळे याच्या सामन्याचे दर हे अधिक आहेत. इंग्लंडच्या सामन्यांचे दर यापेक्षा कमी आहेत. 


> भारतचा पहिला सामना ५ जुनला द. आफ्रिकेशी हाेईल. येथील तिकीटाचे दर ८८७० रुपे आहे. येथे हाेणाऱ्या इंग्लंडच्या सामन्यासाठी ४४०० रुपयांचे तिकीट दर.


> भारत-श्रीलंका सामना लीड्सवर ६ जुलै राेजी हाेईल. या सामन्यासाठीच्या तिकीटाचे दर अधिक असल्याचे दिसते. 

 


खर्च: वर्ल्डकप २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील स्पर्धेपेक्षा ११ % महागडा 

> भारतमध्ये  २०११ ला विश्वचषकाच्या आयाेजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आयसीसीने ८३४ काेटी रुपये दिले हाेते. 


> आयसीसीने  २०१५ मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड मंडळाला १२५० काेटी दिले. यंदा इंग्लंडला १३९० काेटी रुपये मिळणार आहे.   


> सूत्रांच्या माहितीनुसार यंदा महागाई माेठ्या प्रमाणात वाढल्याने बजेटमध्येही झपाट्याने वाढ झाली. त्यामुळेच यंदाचा वर्ल्डकप हा गत वेळच्या स्पर्धेपेक्षा अधिक महागडा मानला  जाताे. 

 

 

महसूल : ईसीबीला तिकीट विक्रीमधून ३५३ काेटींच्या महसुलाची यंदा आशा 
> ईसीबीला यंदाच्या विश्वचषकातील सामन्यांच्या तिकीट विक्रीमधून ३५३ काेटी रुपयांच्या महसुलच्या कमाईची आशा आहे. यासाठी मंडळाने माेठ्या प्रमाणात तिकीट विक्री केली आहे. 

 

प्रेक्षक पसंतीचे धाेरण
> भारताचे ९ पैकी ५ सामने वीकेंडला, डिजिटल प्लॅटफाॅर्मवर थेट प्रक्षेपण
> भारताच्या सर्व सामन्यांसह उपांत्य लढत व फायनलचे आयाेजन दुपारी

 

प्रथमच ३० काेटी चाहते डिजिटल प्लॅटफाॅर्मवर सामने पाहणार 
आयसीसीच्या  मीडिया राइट्स, ब्रॉडकास्ट आणि डिजिटलचे हेड  आरती डबास यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या विश्वचषकादरम्यान ३० काेटी चाहत्यांना डिजीटल प्लॅटफाॅर्मवर सामन्यांचा  आनंद लुटता येणार आहे. या चाहत्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी, याच उद्देशातून आम्ही नव्याने हा प्रयाेग साकारत आहाेत. हाॅटस्टारच्या माध्यमातून ३० काेटी चाहते या सामन्याशी जुळलेेले असतील. आम्ही भारतामध्ये विविध सात प्रादेशिक भाषांमध्ये या विश्वचषकाचे कव्हरेज करणार आहाेत. आयसीसीने पहिल्यांदा सर्वच १० वार्मअप सामन्यांच्याही प्रक्षेपणाचा निर्णय घेतला. भारतामध्ये आॅयनाॅक्स, युएइमध्ये नाेवाे आणि रिल, बहरीनमध्ये नाेवावर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहेत. यासाठी अमेरिकेच्या कंपनीसाेबत खास करार करण्यात आलेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...