आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • The World's Richest Person, Bezo Claim Allegation Of Blackmailing On The Enquirer 

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बेजो यांचा एनक्वायरर'वर ब्लॅकमेलिंगचा आरोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजो आणि जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाक्युद्ध आणखी वाढताना दिसत आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेजो यांनी नॅशनल इनक्वायरर आणि त्याचे प्रकाशक डेव्हिड पेक्कर यांच्यावर वसुली आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. पेक्कर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे असल्याचे मानले जाते.
 
अमेरिकन मीडिया इंक (एएमआय)चे मासिक नॅशनल इनक्वायररने अलीकडेच बेजो यांचे माजी टीव्ही निवेदक लाउरीन सांचेज यांच्यासोबत असलेल्या संबंधांविषयी बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर बेजो यांनी ही बातमी राजकीय प्रेरणेने तर लावली नाही ना, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बेजो हे स्वत: सुप्रसिद्ध वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'चे मालकदेखील आहेत. वॉशिंग्टन पोस्टने ट्रम्प यांच्याविरोधात अनेक लेख छापले आहेत. 

 

बेजो यांच्यानुसार इनक्वायरर यांनी धमकी दिली आहे की, जर त्यांनी हा शोध घेण्याचा प्रयत्न थांबवला नाही तर त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्र आणि बातम्या छापल्या जातील. ही बातमी छापल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट केले की, 'याची माहिती मिळून दु:ख झाले की, जेफ 'बोजो' यांना त्यांचा प्रतिस्पर्धी मात देत आहे. वॉशिंग्टन पोस्टपेक्षा या प्रतिस्पर्ध्याची बातमी कितीतरी पटीने चांगली आहे. वॉशिंग्टन पोस्टदेखील लवकरच योग्य हातात जाईल अशी मला अपेक्षा आहे.' 

 

बेजो यांच्याविरोधात असण्याचे कारण : 
बेजो यांच्या मते सौदी पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येशी संबंधी वॉशिंग्टन पोस्टच्या कव्हरेजपासूनच इनक्वायरर त्यांच्याविरोधात आहे. ट्रम्प यांच्याकडे इशारा करत त्यांनी लिहिले की, 'हे समजणे अवघड आहे की, खगोशी हत्याकांडावर कव्हरेजमुळे कोणत्या लोकांच्या कमजोर बाजूवर जोर पडला आहे.'

 

वकिलाचा धमकीवजा ई-मेल : 
बेजो यांनी एनक्वायररचे वकील जॉन फाइन यांच्या ई-मेलचाही उल्लेख केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, त्यांच्या मासिकाने राजकीय प्रेरणेतून वृत्त छापलेले नाही. हे वृत्त छापण्यामागचे खरे कारण बेजो सर्वात श्रीमंत आणि विशिष्ट वजन असलेले व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी छापलेल्या बातम्या लोक विशेष लक्ष देऊन वाचतात. दुसरीकडे याच ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले की, जर बेजो यांनी हे वृत्त राजकीय प्रेरणेतून छापलेले नसल्याचे जाहीर केले तर त्यांच्याविरोधातील लेख आणि छायाचित्र छापणे थांबवले जाईल. 
 

बातम्या आणखी आहेत...