आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The World's Second Most Popular Sport Tournament Today; World Cup In England 20 Years Later

जगातील दुसऱ्या सर्वात लोकप्रिय खेळातील मोठी स्पर्धा आजपासून; २० वर्षांनी इंग्लंडमध्ये विश्वचषक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बकिंघम पॅलेससमोर बनलेल्या लंडन मॉलबाहेर विश्वचषक ट्रॉफीच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस. या प्रतिष्ठित मॉलसमोर ब्रिटनची प्रसिद्ध लंडन मॅरेथॉनदेखील पूर्ण होते - Divya Marathi
बकिंघम पॅलेससमोर बनलेल्या लंडन मॉलबाहेर विश्वचषक ट्रॉफीच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस. या प्रतिष्ठित मॉलसमोर ब्रिटनची प्रसिद्ध लंडन मॅरेथॉनदेखील पूर्ण होते

लंडन - आजपासून पुढील ४६ दिवसांपर्यंत क्रिकेटपेक्षा काही मोठे असू शकते का, कारण क्रिकेटची सर्वात मोठी आयसीसी विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होत आहे. विश्वचषकात इंग्लंडमधील १० शहरांतील ११ मैदानांवर एकूण ४८ सामने होतील. या विश्वचषकात खेळत असलेल्या ५० टक्के टीम आशियातील अाहेत, असे पहिल्यांदा असे होत आहे. एकूण १० टीम खेळत आहेत, ज्यात पाच टीम आशियाच्या असून त्यात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघाचा समावेश आहे. २०१५ मध्येदेखील पाच टीम खेळल्या होत्या, तेव्हा एकूण १४ टीम स्पर्धेत होत्या. तेव्हा आशियाई टीमच्या सहभागाची सरासरी कमी होती. 


एक आणखी महत्त्वाची गोष्ट - ज्या इंग्लंडने १४२ वर्षांपूर्वी जगाला क्रिकेट खेळ दिला, यंदा २० वर्षांनी तेथे विश्वचषक परतला आहे. यापूर्वी १९९९ मध्ये इंग्लंडला यजमानपद मिळाले होते. इंग्लंडने सर्वाधिक एकूण पाच वेळा विश्वचषकाचे आयाेजन केले आहे. पहिली अधिकृत कसोटी १८७७ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली गेली. 


क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारात ७० कोटी रुपये पारितोषिक ठेवण्यात आले. यातील विजेत्या टीमला २८ कोटी रुपये दिले जातील, जे गेल्या विश्वचषकापेक्षा ८ टक्के अधिक आहे. २०१५ मधील विजेता ऑस्ट्रेलियाला २६ कोटी रुपये मिळाले होते. सोबत जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पसंतीच्या या खेळातील किताबाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

यंदा टीम इंग्लंड सर्वात फॉर्मात; भारतीय टीम दुसऱ्या स्थानावर 

२०१५ विश्वचषकानंतर प्रत्येक टीमच्या जय-पराजयाचा आलेख पाहता यात इंग्लंड टीम नंबर वन आहे. त्यांच्या जय-पराजयाची सरासरी २.५१ म्हणजे सरासरी २.५१ सामने जिंकल्यानंतर टीम एका सामन्यात हरते. यंदा इंग्लंड टीम मजबूत दावेदार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची सरासरी १.६५ अाहे. टीम तिसऱ्या स्थानावर आहे. नंबर दोनवर भारतीय संघ आहे. संघाची विजयाची सरासरी १.८१ असून त्यानंतर एक सामना गमावत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...