आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्युटी पार्लरचे आमिष दाखवून युवतीवर अनेकवेळा बलात्कार, चौघांविरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्युटी पार्लर टाकून देण्याचे आमिष दाखवून युवतीशी केली सलगी, मेहुण्याच्या घरी करायचा बलात्कार

परभणी - पूर्णा शहरातील एका युवतीस मोठे ब्युटीपार्लर टाकून देण्याचे आमिष दाखवून दोन महिन्यात अनेकवेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील एका युवकाने तीन जणांच्या मदतीने हा प्रकार केला असल्याचे पीडितेने पूर्णा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.11) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून चौघा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पूर्णा शहरातील एका नातेवाईकाकडे वास्तव्यास असलेल्या 24 वर्षीय युवतीस विटा (ता.केज, जि.बीड) येथील शुभम धनराज गायकवाड याने तिला मोठे ब्युटीपार्लर टाकून देण्याचे आमिष दाखवून सलगी केली. यानंतर 2 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या दरम्यान त्याने तिला आपला मेहुणे गणेश पांचाळ याच्या पूर्णा शहरातील हिंगोली गेट जवळील घरी बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यासाठी शुभम यास गणेश पांचाळ व त्याचा चुलत भाऊ अभिषेक या दोघांनी मदत केली. शुभम गायकवाड याने तिघांच्या मदतीने तिला घरात बंद करून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही पीडित युवतीने पूर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.