आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमधील तरुणाने पाळली 17 इंची अत्यंत विषारी गोम; तिच्या खाण्याचीही घेतो पूर्ण काळजी 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैवान- विषारी गोमेचा उल्लेख येताच आपण घाबरून जातो. पण तैवानमधील एका तरुणाने विषारी गोम पाळली आहे. ती १७ इंचांची आहे. २६ वर्षांच्या नीन चेंग नावाच्या तरुणाच्या संपूर्ण शरीरभर ती फिरते. तिच्या खाण्याचीही तो पूर्ण काळजी घेतो. त्याचे आवडते कॅट फूड तो तिला खायला देतो. पण इतरांनी असे करू नये, असा सल्लाही चेंग देतो. तो म्हणतो, 'ही विषारी गोम माझ्या अंगावर फिरली तरी मला काही होत नाही. तिने दंश केला तरी मला थोड्या वेदना होतात. पण ती माझ्यासाठी धोकादायक नाही. मला त्याची सवय झाली आहे.' चेंग तिला हाताने अन्न खाऊ घालतो. 

 

जीवशास्त्राचा अभ्यासक असलेल्या चेंगने ही गोम २०१४ मध्ये आणली होती. तेव्हा ती खूप लहान होती. चेंग म्हणतो, ही गोम खूप नम्र असून सहजतेने हाताळता येते. यासाठी तिची दिनचर्या आणि तिची शास्त्रीय माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. गोम स्वत:पेक्षा १५ पटींनी मोठ्या भक्ष्याला विषप्रयोगाद्वारे कमकुवत बनवू शकते. ही वास्तव माहिती असून चेंग तिच्याबाबत बिनधास्त आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...