आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार ओमराजे यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरूणाला अटक, एका व्हिडिओद्वारे सांगितले हल्ला करण्यामागचे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उस्मानाबाद
 - उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला होता. या हल्ल्यात ओमराजेंना कुठलीही गंभीर दुखापत झालेली नव्हती. हल्ल्यानंतर हल्लेखोर तरुणाने तेथून पळ काढला होता. आता या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वतःहून हल्ला केल्याची त्याने कबुली देत हा हल्ला का केला हेही सांगितले आहे. 

अजिंक्य टेकाळे असे या हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे तो म्हणाला. त्याने स्वतः हुन हल्ला केल्याची कबुली दिली आहे. खासदार ओमराजे यांनी कारखाना बंद पाडला, हजारो लोकांना बेघर केले तसेच त्यांच्यामुळे बेरोजगारी वाढवली असा आरोप या तरुणाने केला आहे. या सर्व गोष्टींमुळे खासदार ओमराजे यांच्याविषयी मनात राग होता यामुळे हा हल्ला केल्याचे त्याने सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्याने केली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने चाकू हल्ला केला. आरोपी तरुणाने सुरुवातीला ओमराजे यांच्या हातात हात दिला. यानंतर दुसऱ्या हाताने हातावर आणि मनगटावर वार केले. मनगटावर चाकूचा वार बसून ते जखमी झाले. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावातील रस्त्यावर चालत होते. त्याचवेळी गर्दीत घुसून आरोपीने हल्ला केला आणि पसार झाला होता.

बातम्या आणखी आहेत...